कोरोनाबाधितांचा आकडा 13 हजारांच्या टप्प्यात!; आज गाठली फिफ्टी!; 58 रुग्णांना डिस्चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 9 जानेवारीला 50 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 58 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 419 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 369 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 50 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 9 जानेवारीला 50 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 58 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 419 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 369 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 50 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 50 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 284 तर रॅपिड टेस्टमधील 85 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : सोनुशी 1, खामगाव शहर : 9, खामगाव तालुका : वळती 1, बुलडाणा शहर : 9, चिखली तालुका : चंदनपूर 1, चांधई 1, चिखली शहर : 4, बुलडाणा तालुका : येळगाव 1, पोखरी 1, देऊळगाव राजा तालुका : सुरा 1, धोत्रा 1, शेगाव शहर : 5, शेगाव तालुका : जानोरी 1, आळसणा 1, सिंदखेड राजा शहर : 1, जळगाव जामोद शहर : 3, मोताळा तालुका : पिंपळगाव देवी 1, मोताळा शहर : 3
58 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 58 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः देऊळगाव राजा : 4, जळगाव जामोद : 3, शेगाव : 5, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 4, अपंग विद्यालय 9, आयुर्वेद महाविद्यालय 7, मोताळा : 10, सिंदखेड राजा : 1, खामगाव : 7, चिखली : 4, मेहकर :1, मलकापूर: 2.
317 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 93517 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12440 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 720 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12914 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 317 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 157 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.