कोरोनाचे आणखी 3 बळी, बाधितांचा आकडा 28 हजार पार
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 19 मार्चला कोरोनाने आणखी 3 बळी घेतले असून, उपचारादरम्यान संजयनगर, देऊळगाव राजा येथील 50 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 75 वर्षीय पुरुष, जानेफळ ता. मेहकर येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 732 बाधित नव्याने आढळल्याने एकूण बाधितांचा आकडा 28 हजार पार गेला आहे. 387 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5435 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4703 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 732 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 432 व रॅपिड टेस्टमधील 332 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 637 तर रॅपिड टेस्टमधील 3765 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 92, बुलडाणा तालुका : देऊळघाट 1, नांद्राकोळी 1, दहीद 1, धाड 4, कुंबेफळ 1, घाटनांद्रा 1, चांडोळ 1, सुंदरखेड 3, कुलमखेड 1, डोंगरखंडाळा 2, सागवन 4, शिरपूर 1, बिरसिंगपूर 3, पोखरी 1, डोमरूळ 1, कोलवड 4, मलकापूर शहर : 13, मलकापूर तालुका : दसरखेड 4, लासुरा 2, सावळी 1, उमाळी 1, नरवेल 1, पिंपळखुटा 5, निंबारी 3, लोणवडी 1, देवधाबा 2, वाघुड 3, बहापुरा 1, चिखली शहर : 63, चिखली तालुका : ढासाळवाडी 1, पेठ 1, मेरा 2, खासगाव 1, केळवद 1, खैरव 1, पेनटाकळी 1, सावरगाव 1, सवणा 2, मोहाडी 1, मोहोज 1, अमडापूर 2, मंगरूळ नवघरे 1, पळसखेड 1, हातणी 2, वैरागड 1, रानअंत्री 1, सोनेवाडी 2, येवता 7, गांगलगाव 1, शेलूद 1, इसोली 2, उंद्री 2, मोताळा शहर : 23, मोताळा तालुका : तालखेड 1, शिरवा 1, शेलापूर 1, कोथळी 1, डिडोळा 1, लिहा बु 3, रोहीणखेड 1, गुळभेली 2, परडा 7, खरबडी 1, बोराखेडी 1, किन्होळा 1, घुस्सर 1, आव्हा 1, कुऱ्हा 1, पिं. देवी 3, सारोहा 1, पिंपळपाटी 1, जळगाव जामोद शहर : 5, जळगाव जामोद तालुका : आडोळ 3, मानेगाव 5, गोळेगाव खु 2, आसलगाव 8, देऊळगाव राजा शहर : 7, देऊळगाव राजा तालुका : पिंप्री आंधळे 1, पाडळी शिंदे 2, अंढेरा 1, सिनगाव जहा 1, असोला जहाँगिर 1, सुरा 1, देऊळगाव मही 7, दिग्रस 1, गिरोली 1, सिंदखेड राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : बाळसमुद्र 1, शिंदी 1, वरूडी 1, साखरखेर्डा 2, दत्तपूर 5, आडगाव राजा 2, सावरगाव माळी 2, शिवणी टाका 1, देवखेड 2, हिवरखेड 1, उमरद 1, किनगाव राजा 1, शेंदुर्जन 1, गुंज 1, संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : सोनाळा 2, टाकळेश्वर 1, वरवट खंडेराव 1, बावनबीर 4, पातुर्डा 3, वानखेड 3, वरवट 4, उकडगाव 2, शेगाव शहर : 46, शेगाव तालुका : गौलखेड 1, लोहारा 2, लासुरा 1, गायगाव 1, माटरगाव 1, जवळा 2, जानोरी 1, काटोडा 1, खामगाव शहर : 92, खामगाव तालुका : किन्ही महादेव 1, पिंपळगाव राजा 1, जनुना 2, निमकवळा 1, पिंप्री कोरडे 1, हिंगणा कारेगाव 1, सुटाळा 6, मेहकर तालुका : डोणगाव 1, जानेफळ 2, सांगवी 1, वर्दडी वैराळ 3, हिवरा आश्रम 11, रत्नापूर 5, बाभुळखेड 2, उकळी 5, कळमेश्वर 2, जयताळा 3, महागाव 1, ब्रह्मपुरी 1, देऊळगाव माळी 6, अंत्री देशमुख 1, मेहकर शहर : 21, नांदुरा शहर : 4, नांदुरा तालुका : काटी 1, शिरसोळी 1, हिंगणा 2, शेंबा 3, खैरा 2, टाकरखेड 3, टाकळी वतपाळ 2, चांदुर बिस्वा 3, वडनेर 1, धानोरा 4, लोणार तालुका : तांबोळा 1, मोप 1, गांधारी 1, धायफळ 1, महारचिकना 1, पिंपळनेर 1, बिबी 1, असोला 1, सुलतानपूर 2, पळसखेड 2, देऊळगाव 2, बिबखेड 1, मांडवा 1, बोरखेडी 5, देऊळगाव वायसा 14, खळेगाव 6, लोणार शहर : 20, मूळ पत्ता पारध जि. जालना 1, तुळजा खुर्द जि. अकोला 1, खोगी ता. पातूर 1, फर्दापूर जि. जळगाव 1, यावल जि. जळगाव 1, जालना 1, रिसोड जि. वाशिम 1, वालसावंगी जि. जालना 1, जाफराबाद जि. जालना 1, सोनखेड जि. जालना 1, अमरावती 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 732 रुग्ण आढळले आहेत.
387 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 387 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग 34, मुलींचे वसतिगृह 46, कोविड हॉस्पिटल 9, खामगाव : 14, शेगाव : 96, देऊळगाव राजा : 41, मेहकर : 27, मलकापूर : 38, लोणार : 7, मोताळा : 26, जळगाव जामोद : 3, सिंदखेड राजा : 7, चिखली : 39.
4802 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 177154 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 23503 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 4202 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 177154 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 28537 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 4802 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 232 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.