कोरोना बळी @ 650 !; नव्या 35 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आज, 15 जूनला जानेफळ (ता. मेहकर) येथील 39 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण बळींचा आकडा 650 वर गेला आहे. दिवसभरात नवे 35 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 148 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण …
 
कोरोना बळी @ 650 !; नव्या 35 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आज, 15 जूनला जानेफळ (ता. मेहकर) येथील 39 वर्षीय पुरुषाचा मृत्‍यू झाला आहे. याचबरोबर एकूण बळींचा आकडा 650 वर गेला आहे. दिवसभरात नवे 35 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 148 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3100 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3065 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 19 व रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 333 तर रॅपिड टेस्टमधील 2732 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : पळसखेड भट 1, शिरपूर 1, संग्रामपूर तालुका : कुंभारखेड 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : पिंपळगाव 1, सवणा 1, तेल्हारा 2, शेलगाव जहागीर 2, अंत्री खेडेकर 1, मंगरूळ नवघरे 2, एकलारा 1, करवंड 1, मेहकर तालुका : सोनाटी 1, जळगाव जामोद शहर : 7, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 1, लोणार तालुका : बिबी 2, पिंप्री खंडारे 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 35 रुग्ण आढळले आहे.

143 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 148 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 534695 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85250 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1093 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86043 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयात 143 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 650 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.