कोरोना : दोन बळी, नवे 98 रुग्‍ण!; 129 रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने आज, 8 जूनला दोन बळी घेतले. नव्याने 98 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 129 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3960 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3862 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 98 अहवाल पॉझिटिव्ह …
 
कोरोना : दोन बळी, नवे 98 रुग्‍ण!; 129 रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने आज, 8 जूनला दोन बळी घेतले. नव्याने 98 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 129 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3960 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3862 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 98 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 68 व रॅपीड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 710 तर रॅपिड टेस्टमधील 3152 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर :10, बुलडाणा तालुका : कोलवड 1, येळगाव 1, रायगाव 1, मासरूळ 1, दहीद 1, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : खामखेड 1, बोराखेडी 2, पुन्हई 1, रोहिणखेड 1, वडगाव 1, खामगाव शहर : 10, खामगाव तालुका : जयपूर लांडे 2, गोंधनापूर 1, कदमापूर 1, शेगाव शहर : 4, शेगाव तालुका : जानोरी 1 देऊळगाव राजा तालुका : चिंचखेड 1, चिखली शहर : 8, चिखली तालुका : अमडापूर 1, गोद्री 2, कोलारा 1, मुंगसरी 1, पिंपळवाडी 1, भोकर 1, पेठ 1, सातगाव भुसारी 2, रोहडा 1, कनारखेड 2, संग्रामपूर तालुका : शेवगा 3, अकोला बुद्रूक 1, सवडद 2, मेहकर शहर : 4, मेहकर तालुका : आंध्रुड 1, पेनटाकळी 4, दुर्गबोरी 1, मोहतखेड 1, हिवरखेड 1, जळगाव जामोद शहर :1, जळगाव जामोद तालुका : मडाखेड 1, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : शेलगाव मुकुंद 2, दादगाव 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : देऊळगाव कोळ 1, बाबुळखेड 1, शिवणी 1, ब्राह्मण चिकना 1, परजिल्हा पिंप्री डोळी ता. पातूर 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 98 रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चांडोळ (ता. बुलडाणा) येथील 60 वर्षीय महिला व गुगळी (ता. मोताळा) येथील 72 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

बळींचा आकडा 635 वर
आज 129 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 510401 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84242 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1062 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85709 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 832 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 635 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.