कोरोना ः मृत्यूचे तांडव थांबले!; अवघे 89 रुग्ण घेताहेत उपचार!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मृत्यूचे तांडव अखेर थांबल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. आज, 19 जूनला नव्या 39 कोरोनाबाधितांची भर पडली असून, दिवसभरात 46 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. सध्या रुग्णालयांत 89 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3259 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 3220 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 39 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 499 तर रॅपिड टेस्टमधील 2721 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : साखळी 1, वरूड 1, देऊळगाव घाट 2, अटकळ 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : करवंड 1, सावंगी गवळी 2, शेलूद 1, कोनड 2, खामगाव शहर : 2, खामगाव तालुका : तांदुळवाडी 1, कवडगाव 1, घाटपुरी 1, नांदुरा तालुका : पोटळी 1, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : भिवगण 1, उंबरखेड 2, जळगाव जामोद तालुका : सुनगाव 1, धानोरा 1, लोणार शहर : 1,लोणार तालुका : खुरमपूर 2, मेहकर तालुका : वर्डदी 1, सिंदखेड राजा तालुका : भंडारी 1, संग्रामपूर शहर : 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, शेगाव तालुका : जानोरी 1, मलकापूर तालुका : घिर्णी 3, मोताळा तालुका : चिंचपूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 39 रुग्ण आढळले आहेत. आज 46 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
एकूण बाधितांचा आकडा 86207 वर
आजपर्यंत 545795 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85465 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1693 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86207 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 653 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.