कोरेगावमध्ये कोरोनाचा विस्फोट; 37 ग्रामस्थ बाधित!; जिल्ह्यात 3 बळी!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 20 मार्चला कोरोनाने 3 बळी घेतले असून, उपचारादरम्यान पिंपळपाटी ता. मोताळा येथील 71 वर्षीय पुरुष, जुनागाव, बुलडाणा येथील 84 वर्षीय पुरुष, वॉर्ड क्रमांक 2 नांदुरा येथील 74 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरेगाव (ता. लोणार) येथे कोरोनाचा विस्फोट झाला असून, तब्बल 37 ग्रामस्थांना कोरोनाने बाधित केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात 738 नव्या बाधितांची भर पडली असून, 538 रुग्ण बरे झाल्यान त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
का) दि.20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4364 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3596 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 768 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 356 व रॅपीड टेस्टमधील 412 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 566 तर रॅपिड टेस्टमधील 3030 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3596 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 70 बुलडाणा तालुका : सुंदरखेड 3, डोंगरखंडाळा 1, शिरपूर 2, देऊळघाट 3, सागवन 2, घाटनांद्रा 1, अजिसपूर 1, भडगाव 1, चोथा 1, उमाळा 1, दहिद खुर्द 1, रायपूर 2, धाड 5, कुंबेफळ 1, हतेडी 1, दत्तपूर 1, माळवंडी 4, खामगाव शहर : 68, खामगाव तालुका : लाखनवाडा 1, चिंचपूर 1, राहूड 1, फत्तेपूर 1, ढोरपगाव 2, टेंभुर्णा 4, खुटपुरी 1, बोरगाव खुर्द 1, पारखेड 9, पिंपळगाव राजा 1, आवार 1, माक्ता 10, शिर्ला नेमाने 1, नांदुरा तालुका : कोळंबा 1, शिरसोळी 1, वडाळी 1, अवधा 2, पिंपळगाव खुटा 1, पोटा 1, दहिगाव 1, धानोरा 5, बेलाड 1, वडनेर 6, चांदुरबिस्वा 5, मलकापूर शहर : 26, मलकापूर तालुका : बहापुरा 1, लासूरा 4, मोरखेड 1, उमाळी 1, चिखली शहर : 22, चिखली तालुका : अमोना 1, कोळेगाव 1, पेठ 1, पळसखेड 2, किन्ही नाईक 2, बेराला 2, वरूड 1, धोडप 1, अंत्री कोळी 1, अमडापूर 3, मेरा खुर्द 1, अंचरवाडी 1, वळती 1, बोरगाव काकडे 1, गोद्री 1, कटोडा 1, मेरा बुद्रूक 1, असोला 1, खैरव 1, कारखेड 1, भोरसा भोरसी 1, माळशेंबा 1, खंडाळा 1, शेलुद 1, नायगाव 1, सिंदखेड राजा शहर : 8, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 15, दुसरबीड 2, सेलू 1, आडगाव राजा 11, शेळगाव राऊत 9, किनगाव राजा 2, पांगरी बुद्रूक 1, ताडेगाव 1, धंदरवडी 1, भोसा 3, देवखेड 2, शिंदी 2, शेंदूर्जन 4, गुंज 1, सवडत 2, मोताळा तालुका : काबरखेड 2, टाकळी 1, खरबडी 1, दिडोळा 1, .चिंचपूर 1, बोरखेडी 1, धामणगाव बढे 3, कोऱ्हाळा 1, पान्हेरा 5, वारी 2, पोफळी 1, उऱ्हा 4, सहस्त्रमुळी 1, मोताळा शहर : 19, शेगाव शहर : 68, शेगाव तालुका : जवळा 5, गायगाव 1, टाकळी हट 1, लासुरा 1, चिंचोली 5, पहूरजिरा 2, सगोडा 1, संग्रामपूर तालुका : कुंडेगाव 1, पातुर्डा 1, पेसोडा 1, जळगाव जामोद शहर : 29, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 4, पिंपळगाव काळे 1, भेंडवळ 1, भिंगारा 4, मांडवा 12, देऊळगाव राजा शहर : 36, देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 7, देऊळमही 5, वाकी 1, गोंधनखेड 2, पांगरी 4, सुरा 2, जांभोरा 3, तुळजापूर 1, सिनगाव जहाँगीर 7, निमखेड 3, डोईफोडे वाडी 1, रुमना 1, पिंपळखुटा 1, सरंबा 1, भराडगाव 1, खैराव 2, पिंपरी आंधळे 1, पाडळी शिंदे 1, लोणार शहर : 3, लोणार तालुका : बिबी 7, पिंपळनेर 1, खळेगाव 2, खंडाळा 1, देऊळगाव कोळ 1, कोरेगाव 37, मेहकर शहर :8, मेहकर तालुका : पेनटाकळी 4, देऊळगाव माळी 1, रत्नापूर 5, शहापूर 1, मुंदेफळ 4, पिंप्री माळी 4, मोळा 1, नांदुरा शहर : 27, मूळ पत्ता जाळीचा देव जालना 5, अकोला 1, औरंगाबाद 1, बाळापूर 1, हिंगोली 1, दिग्रस जि. यवतमाळ 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 768 रुग्ण आढळले आहे.
538 रुग्णांची कोरोनावर मात
आज 538 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 67, कोविड हॉस्पिटल 34, मुलींचे वसतिगृह 2, शेगाव : 108, खामगाव : 56, नांदुरा : 31, देऊळगाव राजा : 37, चिखली : 61, मेहकर : 8, लोणार : 14, जळगाव जामोद : 29, सिंदखेड राजा : 38, मलकापूर : 46, संग्रामपूर : 18, मोताळा : 26.
बळींचा आकडा 235 वर!
आजपर्यंत 180750 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 24041 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 4438 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 29305 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 5029 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 235 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.