आज ६०५ पॉझिटिव्ह! बुलडाण्यात २५ पण मोताळ्यात स्फोट!! मृत्यूची मालिका कायम
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यासाठी आजचा दिवस थोडा दिलासा देणारा ठरलाय! जिल्ह्यातील गेल्या 24 तासांतील नवी रुग्णसंख्या ६०५ असून, आघाडीवरील बुलडाणा तालुक्यात मेगा ब्रेकनंतर आलेले अल्प रुग्ण, ८ तालुक्यांतील आटोपशीर आकडे असा आजचा अहवाल आहे.
हॉट स्पॉट ठरलेल्या बुलडाणा तालुक्यात दीडेक महिन्यानंतर २५ रुग्णांचा आकडा आलाय. याशिवाय शेगाव २३, नांदुरा २६, लोणार १५, सिंदखेड राजा २२, संग्रामपूर १०, मलकापूर ४३, मेहकर ४४ या तालुक्यात कोविड कुमार आटोक्यात असल्याचे चित्र आहे. मात्र मोताळा तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाल्याची स्थिती आहे. गत २५ तासांत तालुक्यात तब्बल १३७ पॉझिटिव्ह आढळले आहेत. देऊळगाव राजा ९५, खामगाव ६२, चिखली ८४, जळगाव जामोद ६९ तालुक्यांतील उद्रेक कायम आहे.
५ मृत्यू
दरम्यान, गत 24 तासांत पाच रुग्ण उपचारादरम्यान दगावले. उपचारादरम्यान भालेगाव बाजार (ता. खामगाव) येथील 78 वर्षीय महिला, येळगाव (ता. बुलडाणा) येथील 67 वर्षीय पुरुष, रोहणा (ता. खामगाव) येथील 55 वर्षीय महिला, चिंचखेड (ता. मुक्ताईनगर) येथील 55 वर्षीय महिला, जळगाव जामोद येथील 32 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
4383 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5038 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4383 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 655 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 469 व रॅपिड टेस्टमधील 186 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 845 तर रॅपिड टेस्टमधील 3538 अहवालांचा समावेश आहे.
आजवर 541 कोरोनाबाधितांचा मृत्यू
आज 711 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 440558 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 75379 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3573 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 81190 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 5270 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 541 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.