आज पुन्हा चार आकडी! देऊळगाव, सिंदखेडराजासह चिखलीत कोरोनाचा स्फोट! 9 तालुक्यांत धुमाकूळ,निर्बंधाना कोविड जुमानेना

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाच्या आग्रहामुळे लादण्यात आलेल्या कडक निर्बंधाना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कोरोना जुमानत नसून, सलग तिसऱ्या दिवशी 4 आकडी कोरोना पॉझिटिव्ह निघाले! आज 18 एप्रिलला हा आकडा 1018 वर स्थिरावला. मात्र लागून असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा व चिखली तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाल्यासारखे चित्र आहे. दुसरीकडे 9 तालुक्यात कोरोनाचा धुडगूस यंत्रणांसह …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाच्या आग्रहामुळे लादण्यात आलेल्या कडक निर्बंधाना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कोरोना जुमानत नसून, सलग तिसऱ्या दिवशी 4 आकडी कोरोना पॉझिटिव्ह निघाले! आज 18 एप्रिलला हा आकडा 1018 वर स्थिरावला. मात्र लागून असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा व चिखली तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाल्यासारखे चित्र आहे. दुसरीकडे 9 तालुक्यात कोरोनाचा धुडगूस यंत्रणांसह नागरिकांच्या उरात धडकी भरविणारा ठरतोय!
राज्य शासनाच्या अफलातून आघाडी पॅटर्ननुसार जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांना कोरोना व नागरिक अजिबात जुमानत नाहीये. यामुळे गत्‌ 3 दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्हचा आकडा चार आकड्यांत म्हणजे हजारात येत आहे. आज हा आकडा 1018 रुग्णांवर आहे. 17 एप्रिलला तो 1285 तर 16 एप्रिलला 1140 वर होता. जिल्ह्याच्या या मोठ्या आकड्यांत काही दिवसांपूर्वी 5 तालुक्यांचा मोठा वाटा राहायचा. आता हे चित्र पूर्ण बदलले आहे. मोठाच घोळ असलेल्या संग्रामपूरचा अपवाद वगळता सर्व 12 तालुक्यांत कोरोनाने धुमाकूळ घातलाय! मध्यंतरी आटोक्यात असलेल्या चिखली तालुक्यात पुन्हा स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी 128 वर असलेल्या या तालुक्यात गेल्या 24 तासांत 197 रुग्ण निघणे धोक्याची घंटा आहे. शेजारील देऊळगाव राजामध्ये 137 तर सिंदखेड राजामध्ये 106 पॉझिटिव्ह आलेत. म्हणजे या 3 तालुक्यांतच 440 रुग्ण आढळून आलेत! लोणारमध्ये 66, मोताळा 55, मेहकर 52 हे तालुकेही मागे नाही. बुलडाणा 98, खामगाव 75, शेगाव 69, मलकापूर 99, नांदुरा 40 या तालुक्यांची ही संख्या नवल नाहीच. उलट काहींचे आकडे कमी वाटावे असे आहेत. जळगाव जामोदमध्ये 22 रुग्ण असून, संग्रामपूरमध्ये (4)रुग्ण आढळले हीच बातमी आहे.
सहा मृत्यू…
दरम्यान गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बुलडाणा येथील टीबी रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच कार्यान्वित केंद्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला, दुसरीकडे महिला रुग्णालयातील तब्बल 5 पेशंटचा 24 तासांत मृत्यू होणे धकादायक बाब ठरावी अशीच आहे.