आज 726 पॉझिटिव्ह, बुलडाणा, मलकापूर सुसाट; तपासणी यंत्रणा ‘होली मूड’मध्ये! संकलन व तपासणी मंदावली!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधीच शनिवार, रविवार असा विकेंड त्यात रंगरंगील्या होळीची भर, यामुळे कदाचित कोरोनाचा बेरंग दुर्लक्षित झाला असावा! परिणामी गत दोन दिवसांत स्वॅब नमुने संकलन व तपासणीचा वेग मंदावला. यामुळे रंगपंचमीला 726 पॉझिटिव्ह चा आकडा आला. मात्र या सौम्य आकडेवारीतही बुलडाणा व मलकापूर तालुक्यांनी अनुक्रमे पावणेदोनशे व दीडशेचा टप्पा …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आधीच शनिवार, रविवार असा विकेंड त्यात रंगरंगील्या होळीची भर, यामुळे कदाचित कोरोनाचा बेरंग दुर्लक्षित झाला असावा! परिणामी गत दोन दिवसांत स्वॅब नमुने संकलन व तपासणीचा वेग मंदावला. यामुळे रंगपंचमीला 726 पॉझिटिव्ह चा आकडा आला. मात्र या सौम्य आकडेवारीतही बुलडाणा व मलकापूर तालुक्यांनी अनुक्रमे पावणेदोनशे व दीडशेचा टप्पा गाठत आरोग्य यंत्रणांच्या उरात धडकी भरविलीच!
मागील 24 तासांत जेमतेम 2542 स्वॅब नमुने संकलन करण्यात आले. यातही 1944 रॅपिडचा मोठा वाटा होता. हे आणि मागील प्रलंबित मिळूनही 3415 नमुन्यांचेच अहवाल प्राप्त झाले. यातील 726 पॉझिटिव्ह आलेत तर 2665 जण भाग्यशाली ठरून होळी एन्जॉय करण्यास मोकळे झाले! सव्वा सातशेमध्ये बुलडाणा 172 आणि मलकापूर 142 या तालुक्याचे मोठे कॉन्ट्रीब्युशन आहे. (होळी म्हटले की कॉन्ट्री हा शब्द आलाच) याशिवाय शेगाव 67, चिखली 65, सिंदखेडराजा 53, मेहकर 44, जळगाव जामोद 43, मोताळा 42 यांचा हिस्सा आहेच. या तुलनेत खामगाव 16, देऊळगावराजा 11, नांदुरा 11 या तालुक्यांचे आकडे अविश्वसनिय वाटावे असेच आहेत. संग्रामपूर सलग 2 दिवस ‘ड्राय’ राहिल्यावर गत्‌ 24 तासात अखेर तालुक्यात 31 पॉझिटिव्ह निघाले.
पॉझिटिव्हीटी रेट गंभीर
दरम्यान होळीचा मूड असला, आकडे कमी असले तरी गत 24 तासांतील पॉझिटिव्हीटी रेट धोक्याचा पातळीवर पोहोचलाय! आजचा दर तब्बल 21.25 इतका आहे. काल 29 तारखेला तो 11.27 टक्के असा नियंत्रणात होता. तो 10 टक्‍क्‍यांपर्यंत आणायचे प्रशासनाचे मनसुबे आहेत. यामुळे होळी (एन्जॉय) झाल्यावर आरोग्य यंत्रणांना यावर चिंतन व कृती करणे आवश्यक ठरते.