अविश्वसनिय! केवळ 341 कोरोना पॉझिटिव्ह!! कमी चाचण्यांचा परिणाम, आज मलकापूर, सिंदखेड राजा आघाडीवर

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः किमान सहाशेच्या घरात खेळणाऱ्या कोरोना पॉझिटिव्हचा आज, 12 एप्रिलचा आकडा खरंच अविश्वनीय वाटावा असाच हाय! मात्र तो काहीसा तांत्रिकदृष्ट्या फसवा असा आहे. याचे कारण अति कमी नमुने संकलन अन् कमी चाचण्या हे होय! बाकी कोणताच चमत्कार नाही की दिलासा नाही. गत् 24 तासांत केवळ 341 पॉझिटिव्ह रुग्ण निघणे ही एरवी दिलासादायक …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः किमान सहाशेच्या घरात खेळणाऱ्या कोरोना पॉझिटिव्हचा आज, 12 एप्रिलचा आकडा खरंच अविश्वनीय वाटावा असाच हाय! मात्र तो काहीसा तांत्रिकदृष्ट्या फसवा असा आहे. याचे कारण अति कमी नमुने संकलन अन्‌ कमी चाचण्या हे होय! बाकी कोणताच चमत्कार नाही की दिलासा नाही.

गत्‌ 24 तासांत केवळ 341 पॉझिटिव्ह रुग्ण निघणे ही एरवी दिलासादायक ब्रेकिंग ठरली असती. गुढीपाडवा भेट ठरली असती. मात्र तो केवळ तांत्रिक (फसवा) खेळ आहे. यामुळे बुलडाणा तालुक्यासह जिल्हावासीयांनी हुरळून जायचं अन्‌ सेलिब्रेशन करायचं काम नाय! मुळात विकेंडला नमुने संकलन कमीच म्हणजे जेमतेम 2233 इतके झाले. यामध्येही रॅपिडचा धडाका (1223) जास्त होता. या तुलनेत केवळ 1903 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 1539 निगेटिव्ह तर 341 पॉझिटिव्ह आलेत. मात्र पॉझिटिव्हीचा दर 17.91 इतका आलाय. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या 5426 इतकी आहे. या फसव्या दुष्काळातही मलकापूर 60, सिंदखेडराजा 51 यांनी अर्धशतकी आकडे गाठलेच! याशिवाय लोणार 39, नांदुरा 31, मोताळा 26, जळगाव 24 यांनी योगदान दिले. मात्र  शतक व द्विशतकाशिवाय समाधान न मानणाऱ्या बुलडाणा तालुक्याचा 21 रुग्णांचा आकडा न पटणारा हाय! खामगावचा 34 , देऊळगाव राजा 14, चिखली 20, मेहकर10 या तालुक्याचे आकडेही असेच न पटणारे आहेत. आठवडा अखेर यंत्रणा हॉलिडे मूडमध्ये असल्याचा हा परिणाम असावा.