अंजनीच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू; दिवसभरात आढळले 82 नवे पॉझिटिव्ह रुग्ण
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 16 फेब्रुवारीला कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा 178 वर गेला आहे. उपचारादरम्यान अंजनी खु (ता. मेहकर) येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 82 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 76 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 430 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 348 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 82 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपिड अँटिजेन टेस्टमधील 26 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 176 तर रॅपिड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर ः 37, बुलडाणा तालुका ः सुंदरखेड 1, गिरडा 1, दहीद 1, चांडोळ 1, चिखली तालुका : हिवरा 1, अमडापूर 1, धोत्रा भणगोजी 1, हातणी 1, चिखली शहर : 11, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर 2, देऊळगाव मही 1, दगडवाडी 1, लोणार शहर : 4, सिंदखेड राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : रूम्हणा 1, शेंदुर्जन 1, मेहकर शहर : 4, मेहकर तालुका : गुंधा 1, मुंदेफळ 1, डोणगाव 2, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : झाडेगाव 1, मूळ पत्ता मुर्तीजापूर जि. अकोला 1, माहोरा ता. जाफराबाद 2
76 रुग्णांनी कोरोनावर केली मात…
आज 76 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : स्त्री रुग्णालय 2, अपंग विद्यालय 12, खामगाव : 9, देऊळगाव राजा : 17, सिंदखेड राजा : 3, चिखली : 9, शेगाव : 5, मलकापूर : 3, लोणार : 6, जळगाव जामोद : 1, मेहकर : 8
627 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 115951 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14221 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1067 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15026 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 627 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 178 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकार्यांनी दिली आहे.