Today’s Corona Update : कोरोनाचे बर्थडे सेलिब्रेशन! सलग दुसऱ्या दिवशी साडे आठशेच्या पल्याड!! 4 तालुक्यांची शतके, संग्रामपूरमध्ये सलग वाढ

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः आपल्या जिल्ह्यातील आगमनाच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर कोरोना आणखीनच जिद्दीने पेटलाय! कोविड कुमारने जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात साडे आठशेच्या पल्याडचा पल्ला गाठला आहे. तब्बल 4 तालुक्यांनी झंझावाती शतके हाणत वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या या मानवतेच्या शत्रूला मोठे प्रेझेन्टे दिलेय. 23 मार्चला 861 पॉझिटिव्ह आले असताना गत 24 तासांत जिल्ह्यात पुन्हा 855 ची भर …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः आपल्या जिल्ह्यातील आगमनाच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर कोरोना आणखीनच जिद्दीने पेटलाय! कोविड कुमारने जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात साडे आठशेच्या पल्याडचा पल्ला गाठला आहे. तब्बल 4 तालुक्यांनी झंझावाती शतके हाणत वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या या मानवतेच्या शत्रूला मोठे प्रेझेन्टे दिलेय.

23 मार्चला 861 पॉझिटिव्ह आले असताना गत 24 तासांत जिल्ह्यात पुन्हा 855 ची भर पडली आहे. स्पर्धा जुंपलेल्या बुलडाणा 166 रुग्‍ण व मलकापूर 157 रुग्‍ण या तालुक्यांची दीड शतकीय नाबाद खेळी आरोग्य यंत्रणांची झोप उडविणारी ठरली. यापाठोपाठ चिखली 128 व खामगाव 109 या तालुक्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात तळाशी असणाऱ्या संग्रामपूर तालुक्याने यापासून स्फूर्ती घेत जवळपास पाऊण शतकाचा पल्ला गाठला. आज संग्रामपूर तालुक्यात 73 रुग्ण आढळले. काल हा आकडा 53 इतका होता. यामुळे शांत असलेल्या संग्रामपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्याने तेथील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.  लोणार मधील आवेग कायम असून, 24 तासांत 46 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

‘ते’ पण नाही मागे…

वर्षपूर्तीला इतर तालुकेही मागे नाहीत. मोताळ्यात  39, देऊळगाव राजा 37, नांदुरा 29, शेगाव 20, रुग्ण आढळले. अर्थात हे तालुके खंदे खेळाडू असल्याने कधीही उसळी मारू शकतात. यामुळे आता या कमी आकड्यांचा दिलासा मानायला अगदी शेंबडं पोरगही तयार नाय!