Corona Virus Update : रुग्‍णालयात सध्या 5749 कोरोनाबाधित घेताहेत उपचार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 5 एप्रिलला कोरोनाने 5 बळी घेतले. उपचारादरम्यान धंदरवाडी ता. सिंदखेड राजा येथील 79 वर्षीय पुरुष, सावरगाव डुकरे ता. चिखली येथील 65 वर्षीय महिला, फर्दापूर ता. मोताळा येथील 68 वर्षीय पुरुष, चौथा ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला व मोताळा येथील 80 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 634 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 5 एप्रिलला कोरोनाने 5 बळी घेतले.  उपचारादरम्यान धंदरवाडी ता. सिंदखेड राजा येथील 79 वर्षीय पुरुष, सावरगाव डुकरे ता. चिखली येथील 65 वर्षीय महिला, फर्दापूर ता. मोताळा येथील 68 वर्षीय पुरुष, चौथा ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला व मोताळा येथील 80 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 634 नव्या बाधितांची भर पडली असून, 932 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2778 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2144 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 634 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 500 व रॅपीड टेस्टमधील 134 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 555 तर रॅपिड टेस्टमधील 1589 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर :95, बुलडाणा तालुका : रायपूर 1, पांगरी 1, सव 1, ढालसावंगी 1, सुंदरखेड 2, मोताळा शहर : , मोताळा तालुका : मूर्ती 1, धामणगाव बढे 1, धोनखेडा 1, टेंभी 3, खामगाव शहर :39 , खामगाव तालुका : सुटाळा 3, कोलोरी 1, आमसरी 1, नागापूर 1, शेगाव शहर :5 , शेगाव तालुका : शिरसगाव निळे 1, चिखली शहर : 31, चिखली तालुका : खैरव 1, अमडापूर 3, उंद्री 1, बेराळा 1, शेलगांव आटोळ 1, तेल्हारा 1, शेलोडी 1, अंचरवाडी 1, शेलसूर 2, बोरगाव काकडे 3, शेलूद 1, माळशेंबा 1, मलकापूर शहर : 3, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 13, दाताळा 1, भाडगणी 1, उमाळी 2, देऊळगाव राजा शहर : 29, देऊळगाव राजा तालुका : उंबरखेड 1, सिनगाव जहाँगिर 1, आळंद 1, कुंभारी 1, खैरव 1, डोढ्रा 1, देऊळगाव मही 5, सावखेड भोई 1, चिंचोली 1, दगडवाडी 1, जुंबडा 2, अंढेरा 1, गव्हाण 1, दिग्रस 1, बायगांव 1, धोत्रा नंदई 1, सिंदखेड राजा शहर :14, सिंदखेड राजा तालुका : सावखेड तेजन 1, देवखेड 1, आगेफळ 1, गोरेगाव 1, निमगाव वायाळ 7, देवखेड 1, दरेगाव 1, जांभोरा 3, वाघजई 1, महारखेड 2, खैरखेड 1, सोयंदेव 1, उमरद 1, साखरखेर्डा 15, नाव्हा 1, मलकापूर पांग्रा 2, आंबेवाडी 1, भोसा 1, शिंदी 2, गुंज 6, पांगरी काटे 1, शेंदुर्जन 4, खामगाव 1, मेहकर शहर :47, मेहकर तालुका : उकळी 4, गांधारी 1, फर्दापूर 1, कळपविहीर 2, साब्रा 1, हिवरा आश्रम 8, देऊळगाव माळी 3, बोरी 2, वेणी 1, डोणगाव 5, सावरगाव 1, लव्हाळा 5, नागापूर 1,भालेगाव 1,लिंबी 3, मादनी 1, संग्रामपूर शहर : 1, संग्रामपूर तालुका : बनोसा 1, खिरोडा 1, वानखेड 1, बेलोरा 1, पातुर्डा 8, टुनकी बु 3, काटेल 1, रिंगणवाडी 2, वरवट बकाल 1, जळगाव जामोद शहर :1, नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका : धानोरा 1, काटी 2, वडनेर 3, डिघी 1, वडनेर 55, सावंगा 1, अवधा 1, कोळंबा 1, पोटा 2, वडाळी 3, लोणार शहर :16, लोणार तालुका : अंजनी 1, देऊळगाव कोळ 2, बिबी 4, मांडवा 5, महारचिकना 1, खळेगाव 1, मातमळ 10, पिंपरखेड 2, कऱ्हा 4, खुर्नाळा 1, गुंज 1, शिवणी 1, पाडोळी 1, चौंढी 1, सरस्वती 2, कारेगाव 1, अजिसपूर 2, भुमराळा 1, किन्ही 7, पार्डा 1, उमरी 1, किनगाव जट्टू 1, बोरी काकडे 8, धायफळ 4, खापरखेड 1, ब्राम्हणचिकना 1, पिंपळनेर 1, बिबखेड 2, पांगरा 2, तांबोळा 1, गणेशपूर 1, मांगवडी 1, हिरडव 1, भोटपूरी 2, परजिल्हा जाळीचा देव ता. भोकरदन 1, अजिंठा 1, वडोदा पानाचे ता. मुक्ताईनगर 1, अकोला 1, हिंगोली 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 634 रुग्ण आढळले आहेत.

बळींचा आकडा 287 वर

आज 932 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 239452 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 35668 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2910 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 41704 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 5749 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 287 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.