Corona Virus Update : 9 तालुक्यांत उद्रेक! जिल्हा 690 तर बुलडाणा, चिखली दीडशेच्या घरात!!

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक काही थांबायला तयार नाहीये! आज जिल्ह्यातील कोविड बाधितांचा आकडा 690 तर बुलडाणा, चिखली हे तालुके दीडशेच्या घरात पोहोचले. यासह 9 तालुक्यांतील पॉझिटिव्हचे आकडे धोक्याची घंटा वाजविणारे ठरले आहेत. गत् 24 तासांत विक्रमी संख्येने म्हणजे तब्बल 5270 स्वॅब नमुने संकलित करण्यात आले. यामध्ये रॅपिडचा सिंहाचा म्हणजे 4097 इतका …
 

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक काही थांबायला तयार नाहीये! आज जिल्ह्यातील कोविड बाधितांचा आकडा 690 तर बुलडाणा, चिखली हे तालुके दीडशेच्या घरात पोहोचले. यासह 9 तालुक्यांतील पॉझिटिव्हचे आकडे धोक्याची घंटा वाजविणारे ठरले आहेत.

गत्‌ 24 तासांत विक्रमी संख्येने म्हणजे तब्बल 5270 स्वॅब नमुने संकलित करण्यात आले. यामध्ये रॅपिडचा सिंहाचा म्हणजे 4097 इतका वाटा आहे. यापैकी 5108 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी तब्बल 690 पॉझिटिव्ह आढळले. बुलडाणा तालुका 146 पॉझिटिव्हसह आघाडीवर आहे. काही दिवसांपासून माघारलेल्या चिखली व तालुक्याने 131 पेशंटसह पुन्हा मुसंडी मारली आहे. याच धर्तीवर शेगाव 86, खामगाव 79, मलकापूर 61, नांदुरा 47, मोताळा 36, सिंदखेड राजा 33 या तालुक्यातील संसर्ग वाढल्याचे गंभीर चित्र आहे. या तुलनेत मेहकर 14, लोणार 9, जळगाव जामोद 5, संग्रामपूर 2 या मोजक्या तालुक्यांतील कमी पॉझिटिव्ह हाच 24 तासांतील दिलासा ठरलाय! मात्र 690 च्या घरात पोहोचलेल्या रुग्ण संख्येने हा दिलासा नाममात्र ठरला आहे.