Breaking! रेशन दुकानदारांचे स्वॅब घेतले; 1 जण निघाला कोरोना पॉझिटिव्ह!!
बुलडाणा( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता कहर व बुलडाणा तहसीलमधील कोविड स्फोट लक्षात घेता तहसीलदार रुपेश खंडारे यांनी अविचल राहून विविध उपाययोजना आखल्या आहेत. कोविडच्या प्रसारास कारणीभूत ( व सुपर स्प्रेडर) ठरू शकणाऱ्या तालुक्यातील रेशन दुकानदारांची कोरोनाविषयक तपासणी याचाच एक भाग आहे.
कार्यालयातील तब्बल 21 कर्मचारी, अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. यामुळे तहसीलदारांसह केवळ 9 कर्मचाऱ्यांवर कामकाजाची मदार आहे. सोमवारच्या ( दि. 15) च्या मुहूर्तावर तहसील कार्यलयात रेशन दुकानदारांच्या कोरोनाविषयक तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे 3 कर्मचारी कार्यालय परिसरातच रेशन दुकानदारांचे स्वॅब नमुने घेत आहेत. पहिल्या दिवशी एकूण 116 पैकी 60 जणांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यापैकी एका दुकानदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र 59 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडलाय! दरम्यान आज, 16 मार्चला उर्वरित 56 जणांचे स्वॅब घेण्यात आल्याचे तहसीलदार श्री. खंडारे यांनी सांगितले.