4 दिवसांतच कोरोनाने घेतले 5 बळी!; आजही मेहकर तालुक्यातीलच एकाचा मृत्यू; दिवसभरात नवे 21 रुग्ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव कधी नष्ट होईल, याची चिंता कायम आहे. त्यातच गेल्या 4 दिवसांत कोरोनाने 5 बळी घेतले असून, आज 8 जानेवारीला उपचारादरम्यान कल्याणा (ता. मेहकर) येथील 69 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता एकूण बळींचा आकडा 157 वर गेला आहे. दरम्यान, दिवसभरात नवे 21 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव कधी नष्ट होईल, याची चिंता कायम आहे. त्यातच गेल्या 4 दिवसांत कोरोनाने 5 बळी घेतले असून, आज 8 जानेवारीला उपचारादरम्यान कल्याणा (ता. मेहकर) येथील 69 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता एकूण बळींचा आकडा 157 वर गेला आहे. दरम्यान, दिवसभरात नवे 21 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 544 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 523 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 19 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 432 तर रॅपिड टेस्टमधील 91 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

देऊळगाव राजा शहर ः 1, सिंदखेड राजा तालुका : पळसखेड चक्का 1, खामगाव शहर : 6, खामगाव तालुका : हिवरा 1, सुटाळा खुर्द 1, मांडका 1, बुलडाणा शहर : 1, चिखली तालुका : कोलारा 1, चंदनपूर 1, काटोडा 1, चिखली शहर : 4, लोणार शहर : 1, संग्रामपूर तालुका : वसाडी 1

35 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आज 35 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे : देऊळगाव राजा : 11, जळगाव जामोद : 2, लोणार : 1, शेगाव : 9, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 1, अपंग विद्यालय 4, आयुर्वेद महाविद्यालय 2, मोताळा : 1, सिंदखेड राजा : 3, खामगांव : 2.

325 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 93148 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12382 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 730 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12864 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 325 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 157 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.