22 वर्षीय तरुणीने घरात घेतला गळफास! बुलडाणा तालुक्यातील धक्‍कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 22 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना गोंधनखेड (ता. बुलडाणा) येथे काल, 31 मार्चला सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. भाग्यश्री दुनियादास पवार (रा. गोंधनखेड) असे या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी गावचे पोलीस पाटील दीपक रामेश्वर भगत यांनी धाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे कारण वृत्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 22 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्‍कादायक घटना गोंधनखेड (ता. बुलडाणा) येथे काल, 31 मार्चला सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. भाग्यश्री दुनियादास पवार (रा. गोंधनखेड) असे या  तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी गावचे पोलीस पाटील दीपक रामेश्वर भगत यांनी धाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आत्‍महत्‍येचे कारण वृत्त लिहिपर्यंत समोर आले नव्‍हते.

पोलीस पाटील शेतात असताना त्यांना गावातील लोकांनी फोन करून कळविले की दुनियास पवार यांच्या मुलीने राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस पाटील घटनास्थळी दाखल होईपर्यंत तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या गळ्याची दोरी सोडून उतरविले होते. याप्रकरणी मृत तरुणीच्या कुणीही नातेवाईकाने पोलीस रिपोर्ट न दिल्याने गावच्या पोलीस पाटलांनी फिर्याद दिली.तरुणीचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.