बुलडाण्याच्‍या महिला रुग्णालयातील 5 रुग्ण दगावले! जिल्ह्यात कोरोना रुग्‍ण आठशेपल्याड!! मेहकरात स्फोट

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोमवारी कमी आलेले पेशंट अन् कमी बळी याने मिळालेला दिलासा क्षणिक ठरला. आज, 18 मे रोजी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 804 वर पोहोचला असून, मेहकारात कोरोनाचा स्फोट झाल्यासारखे चित्र आहे. दुसरीकडे 24 तासांतच बुलडाण्याच्या महिला रुग्णालयातील 5 रुग्ण दगावले असून, बळींची एकूण संख्या 6 इतकी आहे. आठ तासांत …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोमवारी कमी आलेले  पेशंट अन्‌  कमी बळी याने मिळालेला दिलासा क्षणिक ठरला. आज, 18 मे रोजी पॉझिटिव्ह रुग्‍णांचा आकडा 804 वर पोहोचला असून, मेहकारात कोरोनाचा स्फोट झाल्यासारखे चित्र आहे. दुसरीकडे 24 तासांतच बुलडाण्याच्या महिला रुग्णालयातील 5 रुग्ण दगावले असून, बळींची एकूण संख्या 6 इतकी आहे. आठ तासांत एक या सरासरीने महिला रुग्णालयातील रुग्ण दगावल्याने यंत्रणा धास्तावल्या आहेत. खामगाव सामान्य रुग्‍णालयातील एकाचा मृत्यू झाला. यामुळे कालचा दिलासा काही तासांचा ठरलाय!

17 मे रोजी पॉझिटिव्हचा आकडा 550 पर्यंत आला तर बळींची संख्या 3 वर आली होती.  मात्र आज हे चित्र बदलले. गत 24 तासांत पॉझिटिव्ह 804  तर बळी  6 असा कोरोनाचा स्कोअर राहिला! यातही मेहकारात 146 तर बुलडाण्यात 105 पेशंट निघालेत. याशिवाय खामगाव 62, देऊळगाव राजा 87, चिखली 80, नांदुरा 64, मोताळा 69, सिंदखेडराजा 70, मलकापूर 38, जळगाव 33 मधील पेशंटही लक्षणीय ठरावे. या तुलनेत लोणार 27, शेगाव 5, संग्रामपूर 18 मधील रुग्ण कमी आहेत. पण हे दिलासे तकलादू, काही तासांचे असतात हे 17 व 18 मेच्या आकड्यांनी सिद्ध केलंय!