बुलडाणा, शेगावमध्ये कोरोनाचे अर्धशतक; जिल्ह्यात बाधितांची संख्या 18 हजार पार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज, 27 फेब्रुवारीला बुलडाणा आणि शेगावमध्ये कोरोनाने जवळपास अर्धशतकी वाटचाल केली. दिवसभरात जिल्ह्यात एकूण 349 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यासोबतच एकूण बाधितांचा आकडा 18 हजार पार गेला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3276 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2927 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 349 अहवाल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आज, 27 फेब्रुवारीला बुलडाणा आणि शेगावमध्ये कोरोनाने जवळपास अर्धशतकी वाटचाल केली. दिवसभरात जिल्ह्यात एकूण 349 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले असून, यासोबतच एकूण बाधितांचा आकडा 18 हजार पार गेला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3276 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2927 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 349 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 276 व रॅपीड टेस्टमधील 73 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1218 तर रॅपिड टेस्टमधील 1709 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

मलकापूर शहर : 32, मलकापूर तालुका :नरवेल 4, कुंड 5, दुधलगाव 1, जांभुळधाबा 2, वरखेड 1, उमाळी 1, माकनेर 1, पिंपळखुटा 1,  लोणवडी 1, चिखली शहर : 12, चिखली तालुका : अंत्री कोळी 1, मेरा बुद्रूक 1, बोरगाव वसू 1, जांभोरा 2, केळवद 3, सवणा 9,  शेलूद 1, हातणी 2, सावरखेड नजीक 1,  अंचरवाडी 2, चांधई 2, सावंगी भगत 1, आमखेड 1, कोळेगाव 1, अमडापूर 2, भडगाव 2, देऊळगाव राजा शहर : 12,  देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 2, टाकरखेड भागीले 2,  वडगाव 1, देऊळगाव मही 1, उंबरखेड 2, सिनगाव जहागीर 3, शिवणी आरमाळ 1, बुलडाणा शहर : 49, बुलडाणा तालुका : हतेडी 2, धामणगाव 1, गोंधनखेड 2, दत्तपूर 1, दहीद बुद्रूक 1,  मढ 1, सागवन 1, डोंगरखंडाळा 2,  कोलवड 1,  सुंदरखेड 4,  शेलसूर 1, मोताळा शहर : 10,  मोताळा तालुका : पिंप्री गवळी 2, धामणगाव बढे 2, सारोळा मारोती 1, जळगाव जामोद शहर : 5, जळगाव जामोद तालुका : भेंडवळ 1,  खामगाव शहर : 20, खामगाव तालुका : घाटपुरी 1, भालेगाव 5, पिंपळगाव देशमुख 2, कुंबेफळ 2, बोरजवळा 1, दधम 1, निरोड 1, कंचनपूर 1, कंझारा 1, शेगाव शहर : 46, शेगाव तालुका : माटरगाव 1, खेर्डा 1, चिंचखेड 4, चिंचोली 2, खौलखेड 7, जळंब 1,  लोणार शहर : 5, सिंदखेड राजा शहर : 14, सिंदखेड राजा तालुका : पिंपळखुटा 3, शेंदुर्जन 5, रूम्हणा 1, किनगाव राजा 1, लोणार तालुका : हिरडव 2, कुरमपूर 3, गुंधा 3, मेहकर तालुका : जानेफळ 1, गजरखेड 1, संग्रामपूर शहर : 9, नांदुरा तालुका : शेंबा 1, मूळ पत्ता अकोला 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 349 रुग्ण आढळले आहेत.

234 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 234 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : स्त्री रुग्णालय 4,  अपंग विद्यालय 56, देऊळगाव राजा : 13, चिखली : 43, नांदुरा : 9, जळगाव जामोद : 6, सिंदखेड राजा : 8, मलकापूर : 31, लोणार : 2, खामगाव : 36, शेगाव : 26

2644 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू
आजपर्यंत 133572 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15492 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 8742 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 18328 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयांत 2644 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 192 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.