बुलडाणा, चिखलीत कोरोनाचा उद्रेक; दोन शहरांत 37 पॉझिटिव्ह रुग्ण!; जिल्ह्यात दिवसभराचे मीटर 91 वर थांबले!; मोताळ्यात घेतला बळी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा आणि चिखली शहरात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक झाला असून, बुलडाण्यात तब्बल 23 आणि चिखली शहरात 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासकीय यंत्रणाही कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे चिंतित झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 13 फेब्रुवारीला कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. मोताळा येथील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 91 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा आणि चिखली शहरात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक झाला असून, बुलडाण्यात तब्बल 23 आणि चिखली शहरात 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासकीय यंत्रणाही कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे चिंतित झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 13 फेब्रुवारीला कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. मोताळा येथील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 91 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 57 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 478 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 387 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 91 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 61 व रॅपिड अँटिजेन टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 236 तर रॅपिड टेस्टमधील 151 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 387 अहवाल निगेटिव्ह आहेत.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
चिखली शहर : 14, चिखली तालुका : चांधई 1, सवणा 2, बोरेगाव 1, धानोरी 1, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : पिंपळखुटा 2, सिंदखेड राजा तालुका : मलकापूर पांग्रा 1, मेहकर तालुका : अंजनी 1, लोणार शहर : 5, बुलडाणा तालुका : येळगाव 1, डोंगर खंडाळा 1, धामणगाव 1, टाकळी 1, भादोला 1, बुलडाणा शहर : 23, जळगाव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : वाडी 4, सूनगाव 1, खामगाव शहर : 4, मलकापूर शहर : 9, मलकापूर तालुका : दाताळा 1, घिर्णी 1, हरसोडा 1, शेगाव शहर : 6, शेगाव तालुका : जवळा 3, मोताळा तालुका : तळणी 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, मूळ पत्ता हाता ता. बाळापूर जि. अकोला 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 91 रूग्ण आढळले आहे.
57 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 57 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 12, चिखली : 5, देऊळगाव राजा : 8, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 5, अपंग विद्यालय 12, लोणार : 5, शेगाव : 4, नांदुरा :3, सिंदखेड राजा :2, मलकापूर : 1.
460 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 114911 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14069 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 831 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 14705 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 460 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 176 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.