नापिकी, कर्जबाजारीपणा… तो शेतकरी सतत चिंतित राही, कुटुंबाला म्‍हणे कसं होईल आपलं… एक दिवस शेतात जाऊन उचलले टोकाचे पाऊल!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सततचा दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून वर्दडी बुद्रुक (ता. सिंदखेड राजा) येथी शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून काल, 2 मार्चला जीवनयात्रा संपवली. विष्णू तुकाराम साळवे (45) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बँकेचे कर्ज, …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सततचा दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून वर्दडी बुद्रुक (ता. सिंदखेड राजा) येथी शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून काल, 2 मार्चला जीवनयात्रा संपवली.

विष्णू तुकाराम साळवे (45) असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्‍यांच्‍याकडे आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बँकेचे कर्ज, मुलीच्या लग्नातील काही खासगी कर्ज या सर्व गोष्टींचा ते नेहमी विचार कत व पत्नी व मुलांकडे चिंता व्यक्त कत असत. यावर्षी पीक परिस्थिती सुरुवातीला चांगली होती. मात्र अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच लागले नाही. विमा कंपनीने काहीही मदत दिली नाही. काल त्‍यांनी कीटकनाशक प्राशन केले. भाऊकीच्‍या लोकांनी त्‍यांना सिंदखेडराजा येथे सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी जालना येथे हलविण्यास सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे त्यांची प्रकृती जास्त गंभीर असल्याने औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्या कालच त्यांचा मृत्यू झाला. त्‍यांच्‍या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

खामगाव तालुक्‍यात शेतमजुराची आत्‍महत्‍या

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतमजुराने शेतातील निंबाच्‍या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना धोतरा उजाड शिवारात (ता.खामगाव) आज, ३ मार्चच्‍या सकाळी साडेदहाला समोर आली आहे.रमेश निनाजी पिंगळे (55, रा. गारडगाव, ता. खामगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. ते दीपक ठाकूर यांच्‍या शेतात कामाला होते. एकटेच राहत होते. त्‍यांच्‍या आत्‍महत्‍येचे कारण वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही. तपास पोहेकाँ शेख हमीद शेख करीम करत आहेत.