मलकापूरच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू; जिल्ह्यात नव्या 65 बाधितांची भर
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 फेब्रुवारीला कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान चैतन्यवाडी, मलकापूर येथील 84 वर्षीय पुरुष रुग्णाचा मत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 425 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 360 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 65 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 46 व रॅपिड अँटीजेन टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 257 तर रॅपिड टेस्टमधील 103 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
नांदुरा शहर : 4, बुलडाणा शहर : 12, बुलडाणा तालुका : डोंगरखंडाळा 1, देऊळगाव राजा शहर : 7, चिखली शहर : 12, चिखली तालुका : सवणा 1, अमोना 1, किन्होळा 2, जळगाव जामोद शहर : 3, जळगाव जामोद तालुका : वाडी 3, सिंदखेड राजा तालुका : मलकापूर पांग्रा 2, साखरखेर्डा 1, लोणार शहर : 3, लोणार तालुका : शारा 1, खामगाव शहर : 4, शेगाव शहर : 1, मोताळा तालुका : तळणी 1, पोफळी 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : अंजनी 1, धानोरा 1, डोणगाव 2
41 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 41 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 9, स्त्री रुग्णालय 6, चिखली : 9, देऊळगाव राजा : 7, लोणार : 1, शेगाव : 6, जळगाव जामोद : 1, सिंदखेड राजा : 2
407 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 114016 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13954 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1010 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14535 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 407 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 174 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.