जिल्ह्याचे कोरोना बळी पावणेतीनशेच्‍या घरात!; आजही दोन महिलांचा मृत्‍यू; एकूण बाधितांचा आकडा 40 हजार पार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 एप्रिलला कोरोनामुळे आणखी 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान मेहकर येथील 65 वर्षीय महिला व पेठ (ता. चिखली) येथील 50 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात नव्या 929 बाधितांची भर पडली असून, यामुळे एकूण बाधितांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. आज 709 रुग्णांना रुग्णालयातून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 एप्रिलला कोरोनामुळे आणखी 2 महिलांचा मृत्‍यू झाला आहे.  उपचारादरम्यान मेहकर येथील 65 वर्षीय महिला व पेठ (ता. चिखली) येथील 50 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात नव्‍या 929 बाधितांची भर पडली असून, यामुळे एकूण बाधितांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. आज 709 रुग्णांना रुग्‍णालयातून सुटी मिळाली.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5078 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4149 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 929 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 714 व रॅपीड टेस्टमधील 215 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1097 तर रॅपिड टेस्टमधील 3052 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 128, बुलडाणा तालुका : चौथा 1,  केसापूर 1, गुम्मी 1, पांगरी 3,  करडी 1, सुंदरखेड 5,  नांद्राकोळी 3, डोमरूळ 1, तांदुळवाडी 5, साखळी 1, दहीद 1, येळगाव 2,  भादोला 1, बिरसिंगपूर 2, वरवंड 2, सातगाव 1, हतेडी 1,  धाड 3, देऊळघाट 3,  मोताळा शहर :5, मोताळा तालुका : महालपिंप्री 1, खेडा 1, सिंदखेड 2, माळेगाव 1, जयपूर 3, डिडोळा 1, सांगळद 2, शेलगाव बाजार 1, पिंपळगाव देवी 1,  उबाळखेड 1,  तपोवन 2,  वाघजाळ 1, शेलापूर 2,  बोराखेडी 2, लोणघाट 1, लिहा 2, देवपूर 1, आव्हा 13, सारोळा मारोती 1, तळणी 4, दाभाडी 1, काबरखेड 1, मूर्ती 2, निपाणा 2,  खरबडी 2, फर्दापूर 1,  खामगाव शहर :56, खामगाव तालुका : राहुड 1, पिंपळगाव राजा 1,  शेलोडी 1, सुटाळा 4,  गणेशपूर 4, नागापूर 2,  टेंभुर्णा 1, आडगाव 1, सज्जनपुरी 1, जनुना 1, बोथा फॉरेस्ट 2, कारेगाव 1,  लाखनवाडा 1, वझर 1, शेगाव शहर : 62, शेगाव तालुका : येऊलखेड 1, कालखेड 2, टाकळी 1,  कदमपूर 1, जवळा 2, चिंचोली 4, गौलखेड 2, तरोडा कसबा 3, सागड 1, जानोरी 1,  जलंब 3, लासुरा 5, पहुरपुर्णा 1, पलसोडा 1, चिखली शहर : 45, चिखली तालुका : कोलारा 2, केळवद 2, करवंड 1, मेंडगाव 2, पेठ 1, मेरा बुद्रूक 2, शेलसूर 2,  भोकर 1, खोर 1, किन्होळा 2,  चिंचखेडा 1, अंबाशी 1, असोला बुद्रूक 2, माळशेंबा 1, एकलारा 2, वरखेड 2, बोरगाव काकडे 1,  शेलूद 4, अमडापूर 2, शेलगाव आटोळ 1, मलगी 1, सोनेवाडी 1, हातणी 1, सातगाव भुसारी 1, डोंगरशेवली 1, उंद्री 1, गांगलगाव 1,  मलकापूर शहर : 102, मलकापूर तालुका : निंबारी 1, हरणखेड 1,  वरखेड 1, वाकोडी 2, घिर्णी 3, दुधलगाव 3,  बेलाड 2, भाडगणी 1, पिंपळखुटा 6, कुंड बुद्रूक 4, उमाळी 1, रणथम 2, कुंड खुर्द 2, वाघुड 2,  भालेगाव 1,   देऊळगाव राजा शहर : 46, देऊळगाव राजा तालुका : चिंचोली बुद्रूक 1, गव्हाण 2, सावखेड भोई 1, सातेगाव 4, गारखेडा 1, देऊळगाव मही 1, टाकरखेड 1, सिनगाव जहा 5, शिवणी आरमाळ 1,  वाढोणा 2, गारगुंडी 1,  चांगेफळ 1, मेहुणा राजा 1, अकोला देव 1, सिंदखेड राजा शहर :19, सिंदखेड राजा तालुका : वरूड 2, शिवणी टाका 2, वर्दडी 1,  दत्तापूर 2,  जांभोरा 1, शिंदी 1, शेंदुर्जन 3, दुसरबीड 2, हनवतखेड 1, सवडत 1, साखरखेर्डा 1, धंदरवाडी 3, महारखेड 1, झोटिंगा 1, उगला 1, आंचली 3,  केशव शिवणी 1, वाघारी 1, निवडुंगा 1, सुजलगाव 1, खैरखेड 5, किनगाव राजा 4, सोनुशी 1, हिवरखेड 3, चांगेफळ 2, सातेगाव 3, पिंप्री खंडारे 1, आडगाव राजा 1, पिंपरखेड 1, उमरद 1, सोयंदेव 1, मेहकर शहर :17, मेहकर तालुका : शेंदला 1, बाभुळखेड 3,  गोमेधर 1 , लोणी गवळी 2, संग्रामपूर तालुका : चौंढी 1, रूधाना 1,  सोनाळा 1, जळगाव जामोद शहर :15, जळगाव जामोद तालुका : आडोळ 1, सुकळी 1, आसलगाव 2,  सुनगाव 1, सावरगाव 3, जामोद 2, नांदुरा शहर : 51, नांदुरा तालुका : निमगाव 2, धानोरा 1, आलमपूर 13, डिघी 2, पातोंडा 3,  खेर्डा 1, शिरसोळी 1,  काटी 1, वडनेर 2, जिगाव 2, लोणार शहर : 8, लोणार तालुका : आरडव 1, वझार आघाव 2,  पहुर 1, येवती 1, पिंपळनेर 1, देऊळगाव 3, मांडवा 1, बिबी 2,  सरस्वती 2, शारा 1, हत्ता 5, चिंचोली 1, पांगरा 1, धायफळ 2, महारचिकना 2, परजिल्हा कारंजा 1, मासरूळ ता. जाफराबाद 1, खंडवा मध्यप्रदेश 1,  जामनेर 1, बोदवड 1, डोंगरगाव ता. बाळापूर 1, पहूर ता. जामनेर 2,  वरणगाव 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 929 रुग्ण आढळले आहेत.

709 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 709 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 232560 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 33791 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3497 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 40048 कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी 33791 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 5981 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 276 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.