चिखलीच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू; दिवसभरात 45 नवे बाधित
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, आज 7 फेब्रुवारीला उपचारादरम्यान चिखली येथील 65 वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. नवे 45 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 69 रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 292 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 247 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 33 व रॅपीड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 148 तर रॅपिड टेस्टमधील 99 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
सिंदखेड राजा तालुका ः साखरखेर्डा 2, बुलडाणा तालुका : रायपूर 1, बुलडाणा शहर : 9, देऊळगाव राजा शहर : 9, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 3, शेगाव शहर ः 3, शेगाव तालुका : जवळा 1, संग्रामपूर तालुका : इटखेड 1, खामगाव तालुका : कारखेड 1, घाटपुरी 1, खामगाव शहर : 5, मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : जांभूळ धाबा 2, दाताळा 2, जळगाव जामोद तालुका : पिंपळगाव काळे 1, मूळ पत्ता जाफ्राबाद येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 45 रुग्ण आढळले आहेत.
69 रुग्णांना डिस्चार्ज
आज 69 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 22, देऊळगाव राजा : 2, खामगाव : 17, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 1, अपंग विद्यालय 15, शेगाव : 4, जळगाव जामोद : 1, संग्रामपूर : 1, मलकापूर: 5.
342 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 112402 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13805 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1038 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14319 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 342 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 172 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.