चाचण्या जास्त, तरीही पेशंट कमीच! यंत्रणांना मोठा दिलासा, आज 196 बाधित

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः चाचण्या जास्त असतानाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी आल्याने जिल्ह्यात कोविडकुमार माघारल्याचे सुखद चित्र आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाच हजारांवर 5395 अहवाल प्राप्त झाले असतानाही आज, 29 मे रोजी जिल्ह्यात केवळ 196 जण बाधित झाले आहेत. यातुलनेत 5075 जण निगेटिव्ह आलेत. याशिवाय आजची बाधितांची टक्केवारी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः चाचण्या जास्त असतानाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी आल्याने जिल्ह्यात कोविडकुमार माघारल्याचे सुखद चित्र आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाच हजारांवर 5395 अहवाल प्राप्त झाले असतानाही आज, 29 मे रोजी जिल्ह्यात केवळ 196 जण बाधित झाले आहेत. यातुलनेत 5075 जण निगेटिव्ह आलेत. याशिवाय आजची बाधितांची टक्केवारी थेट 3.63 टक्के पर्यंत घसरली आहे. मात्र मृत्यू संख्या कायम आहे. खामगाव व संग्रामपूर प्रत्येकी 26 रुग्णांसह आघाडीवर आहेत. याशिवाय बुलडाणा 20, शेगाव 21, देऊळगावराजा 19, चिखलीत 18, मेहकर 13, मलकापूर 9, नांदुरा 13, लोणार 6, मोताळा 11, जळगाव 11, सिंदखेडराजा 3 अशी बधितांची संख्या आहे.

बुलडाण्याच्या महिला रुग्णालयात 1 तर मलकापूरच्या सामान्य रुग्णालयात दोघा रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. यावर कळस म्हणजे, मृत्यू दर घटल्याने व रुग्ण बरे होण्याचे (रिकव्हरी रेट) 95.63 टक्के झाल्याने यंत्रणांचे  हौसले बुलंद झाले आहेत.