कोरोनाने आज घेतले 2 बळी; आकडा 162 वर; दिवसभरात आढळले 52 पॉझिटिव्ह रुग्ण
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने आज, 20 जानेवारीला 2 बळी घेतले असून, यामुळे बळींचा एकूण आकडा 162 वर गेला आहे. उपचारादरम्यान शेगाव येथील 83 वर्षीय पुरुष व मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 52 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 24 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 648 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 596 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 52 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 49 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 481 तर रॅपिड टेस्टमधील 115 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
खामगाव शहर : 5, खामगाव तालुका : घाटपुरी 1, पळशी 2, बुलडाणा शहर : 18, देऊळगाव राजा शहर : 2, शेगाव शहर : 10, सिंदखेड राजा शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : जाडेगाव 1, सायळा 2, मलकापूर तालुका : बेलाड 4, दुधलगाव बुद्रूक 1, हरणखेड 2, नांदुरा तालुका : खेडगाव 1, चिखली तालुका : वडती 1
24 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 24 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 8, बुलडाणा : अपंग विद्यालय 11, सिंदखेड राजा : 1, खामगाव : 4.
396 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 98166 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12919 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 883 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13477 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 396 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 162 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.