आज 518 पॉझिटिव्ह!, बुलडाणा, खामगाव तालुक्‍यातील कोरोना स्फोट कायम!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कमी नमुने संकलन, कमी अहवाल व सलग सुट्या परिणामी आजचा, 30 मार्च दिलासादायक ठरला. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 518 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात आघाडीवर असलेल्या बुलडाणा व खामगावची शतकीय कामगिरी वगळता अन्य 11 तालुक्यांची संख्या घटल्याचे दिसून आले. सलग सुट्या, त्यातच 2 दिवस चालणारी होळी, रंगीला …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः कमी नमुने संकलन, कमी अहवाल व सलग सुट्या परिणामी आजचा, 30 मार्च दिलासादायक ठरला. गेल्‍या 24 तासांत जिल्ह्यात 518 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात आघाडीवर असलेल्या बुलडाणा व खामगावची शतकीय कामगिरी वगळता अन्य 11 तालुक्यांची संख्या घटल्याचे दिसून आले.

सलग सुट्या, त्यातच 2 दिवस चालणारी होळी, रंगीला माहौल आदी कारणांमुळे स्वॅब नमुने संकलन, तपासणीचा वेग मंदावला. अवघे 1403 संकलन झाले. यातही रॅपिडची संख्या 567 उतकी लक्षणीय होती. या तुलनेत हे व प्रलंबित मिळून 2 हजारपेक्षाही कमी म्हणजे 1977 अहवाल प्राप्त झाले. यामुळे खामगाव 130 व बुलडाणा126 या हॉट स्पॉटचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांतील कोरोनाबाधितांचा आकडा आटोपशीरच दिसून येतो. सिंदखेडराजामध्ये कोविड 19 ने 2021 मध्ये पुन्हा मुसंडी मारल्याचे चित्र आहे. यामुळे तालुक्यातील आकडे सातत्याने वाढत आहेत. गत 24 तासांत तालुक्यात 53 पॉझिटिव्ह निघाले आहेत. शेजारी असलेल्या देऊळगावराजा मध्ये 44, मेहकर व लोणारमध्ये अनुक्रमे 31 व 28  रुग्ण आहेत. या तुलनेत डेंजर झोनमधील चिखलीमध्ये 36, शेगाव तालुक्यात 34, मोताळा 27, मलकापूर 4, नादुरा 5 असे आटोपशीर आकडे आहेत. यातही बुलडाणा व खामगावमध्ये कोरोना रुग्णांचे आकडे सव्वाशेच्या पल्याड जाणे व पॉझिटिव्हीटी रेट 22 टक्‍क्‍यांच्या घरात जाणे धोक्याची घंटा मानली जात आहे. मात्र बुलडाणेकरांनी उद्या मोठ्या आकड्याच्या तयारीत असलेले बरे!