दस्त नोंदणीसाठी कोविडचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य

दुय्यम निबंधक कार्यालयाचे आवाहन बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सहजिल्हा निबंधक वर्ग 1 बुलडाणा व अधिनस्थ एकूण प्रत्येक तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी व इतर कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या पक्षकारांची संख्या विचारात घेता गर्दी जास्त प्रमाणात होते. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव असल्याने व जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याने दुय्यतम निबंधक कार्यालयात …
 

दुय्यम निबंधक कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सहजिल्हा निबंधक वर्ग 1 बुलडाणा व अधिनस्थ एकूण प्रत्येक तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी व इतर कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या पक्षकारांची संख्या विचारात घेता गर्दी जास्त प्रमाणात होते. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव असल्याने व जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याने दुय्यतम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता व इतर कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या पक्षकारांकडे कोविड चाचणीचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य आहे. हा रिपोर्ट पक्षकार उपलब्ध करून देणार नसतील अशा पक्षकारांना कार्यालयात प्रवेश मनाई राहील. ही कार्यवाही 12 एप्रिल 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे. दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी कोविड 19 चा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आणावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 2 बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे.

अन्य नियमही…

नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येण्यापूर्वी दस्त नोंदणीची वेळ आरक्षित करून घ्यावी. आरक्षित वेळेलाच दस्त नोंदणीसाठी यावे. प्रथमत : केवळ दस्त सादर करणाऱ्या एका पक्षकारास व वकीलास (असल्यास) कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. दस्त छाननी, सादरीकरण शिक्का 1 व 2 पूर्ण झाल्यावरच इतर पक्षकारांना दस्तात नमूद नावानुसार क्रमवारी प्रवेश दिला जाईल. पक्षकारांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात आल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात ठरवून दिलेल्या अंतरावरच उभे रहावे. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी तोंडाला मास्क, हात सॅनिटायझरने स्वच्छ करून नंतरच कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. दस्तावर सह्या करण्यासाठी दस्तातील प्रत्येक पक्षकाराने स्वत:चा पेन सोबत आणावा. एकमेकांचा पेन वापरू नये. नोटीस ऑफ इटिमेंशन फिजीकल फायलिंग सद्यःस्थितीत बंद करण्यात आले असून, ई फायलिंगचा वर्जन 1 व वर्जन 2 चा पर्याय उपलब्ध आहे. तरी त्याचा वापर करण्यात यावा. दस्त नोंदणी झाल्यानंतर लगेच कार्यालयाच्या बाहेर पडावे, विनाकारण कार्यालयाच्या आवारात गर्दी करू नये.