जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्‍यता, बातमी लिहीपर्यंत चिखलीत हजेरीही लावली…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांनी वर्तविली आहे. जिल्ह्यात 12 एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट व हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी आणि मळणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. साठवणे शक्य नसेल तर प्लास्टिकने झाकावा. परिपक्व भाजीपाल्याची, फळांची ताबडतोब तोडणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांनी वर्तविली आहे. जिल्ह्यात 12 एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट व हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी  कापणी आणि मळणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. साठवणे शक्य नसेल तर प्लास्‍टिकने झाकावा. परिपक्‍व भाजीपाल्याची, फळांची ताबडतोब तोडणी करून बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था करावी. विजांचा गडगडाट होणार असल्याने झाडाखाली न थांबता इतरत्र सुरक्षित ठिकाणी थांबावे. जनावरांना झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलडाणा यांनी केले आहे. हवामान खात्याच्या अंदाज खरा ठरवत वृत्त लिहिस्तोवर चिखली शहरात हलक्या पावसाने हजेरी लावली होती.