कोरोनाची कहानी संपेना… एक बरा झाला, दुसरा दाखल झाला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाची जिल्ह्यातील कहानी कधी संपेल याची वाट सारेच बुलडाणेकर पाहत आहेत. पण या आजाराबद्दलचे गांभीर्य आणि सजगता हरवल्यामुळे तोही ठाण मांडून आहे. उलट हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांमुळे त्याचे फावत आहे. आज, 18 ऑक्टोबरला एक कोरोना रुग्ण बरा झाला. पण लगेच एक बाधित होऊन रुग्णालयात दाखल झाला. हा रुग्ण संग्रामपूर तालुक्यातील मनार्डीचा …
 
कोरोनाची कहानी संपेना… एक बरा झाला, दुसरा दाखल झाला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाची जिल्ह्यातील कहानी कधी संपेल याची वाट सारेच बुलडाणेकर पाहत आहेत. पण या आजाराबद्दलचे गांभीर्य आणि सजगता हरवल्यामुळे तोही ठाण मांडून आहे. उलट हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांमुळे त्‍याचे फावत आहे. आज, 18 ऑक्‍टोबरला एक कोरोना रुग्‍ण बरा झाला. पण लगेच एक बाधित होऊन रुग्‍णालयात दाखल झाला. हा रुग्‍ण संग्रामपूर तालुक्‍यातील मनार्डीचा आहे. परिणामी उपचार घेणाऱ्या १३ रुग्‍णांची संख्या काही कमी झाली नाही.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 151 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 150 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 141 तर रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 726651 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86915 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 301 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 726651 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87602 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.