अरिहंत कंपनीच्‍या खतात निघाले रेतीचे खडे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेरणीपूर्वी शेतात खत टाकण्यासाठी मेहकर येथील कृषी सेवा केंद्रातून अरिहंत कंपनीचे खत खरेदी केले. मात्र खत निकृष्ट दर्जाचे असून, खताच्या बॅगमध्ये खताऐवजी रेतीचे खडे आढळल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे राजेगाव (ता. सिंदखेडराजा) येथील शेतकऱ्याने केली आहे. मात्र तीन महिने उलटूनही कंपनीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. राजेगाव …
 
अरिहंत कंपनीच्‍या खतात निघाले रेतीचे खडे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेरणीपूर्वी शेतात खत टाकण्यासाठी मेहकर येथील कृषी सेवा केंद्रातून अरिहंत कंपनीचे खत खरेदी केले. मात्र खत निकृष्ट दर्जाचे असून, खताच्या बॅगमध्ये खताऐवजी रेतीचे खडे आढळल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे राजेगाव (ता. सिंदखेडराजा) येथील शेतकऱ्याने केली आहे. मात्र तीन महिने उलटूनही कंपनीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

राजेगाव येथील शेतकरी शरद शेजूळ यांनी २५ मे २०२१ रोजी मेहकर शहरातील दिलीप ट्रेडर्स या दुकानातून अरिहंत कंपनीच्या सुपर फॉस्फेटच्या १० बॅग खरेदी केल्या होत्या. त्यातील ५ बॅग त्यांनी शेतात टाकल्या असता खत निकृष्ट दर्जाचे व खतामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची भेसळ करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. ४ जून रोजी शेजूळ यांनी तत्कालिन प्रभारी कृषी अधिकारी वसंत राठोड यांच्याकडे तक्रार केली. मात्र आतापर्यंत कंपनीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे शेतकऱ्याने बुलडाणा लाइव्हला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

अधिकारी म्हणतात…
राजेगाव येथील शेतकरी शरद शेजूळ यांची तक्रार प्राप्त झाली. त्यांनी विकत घेतलेल्या खताची बिले कृषी अधिकारी कार्यालयाला उशिरा प्राप्त झाली. मेहकर तालुक्यात नव्याने रुजू झालेले कृषी अधिकारी श्री. किशोर काळे यांना याबाबतची माहिती दिली असून, खतांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात येईल. -वसंत राठोड, तत्कालीन प्रभारी कृषी अधिकारी, मेहकर
तालुका कृषी अधिकारी, सिंदखेड राजा