व्वा! क्या बात...रक्तदानाच्या महायज्ञात २२०० पिशव्या रक्त संकलित! राज्यभरातील ७४ शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; निमित्त संदीप शेळकेंच्या वाढदिवसाचे ...
यावर्षी १ फेब्रुवारी रोजी छत्रपतींची भूमी सातारा येथून रक्तदानाच्या महायज्ञानाला प्रारंभ झाला. राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या संयुक्त विद्यमाने संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात ७४ ठिकाणी ही रक्तदान शिबिरे घेण्यात आली. एकाचवेळी राज्यात सर्वात जास्त रक्तदान शिबिरे घेण्याच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.शिबिरांमधून संकलित रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येते. दरवर्षी रक्तदात्यांकडून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
यंदा महाशिवरात्रीनिमित्त डोंगरशेवली येथे आयोजित रक्तदान शिबिरात मुस्लिम बांधवांनी रक्तदानात सहभाग घेत आदर्श ठेवला. उन्हाळ्यात दरवर्षी रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवतो. बऱ्याचदा या महिन्यात आवश्यक शस्त्रक्रिया असतात. रक्तदानाची कमतरता जाणवते. रक्तपेढी व्यवस्थापनाकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात येते. रक्तपिढीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजर्षी शाहू परिवाराच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. गर्दे वाचनालयाच्या सभागृहात १३ मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचा समारोप झाला.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके, शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, अदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर, संजयकाका बाहेकर,राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, विश्वजित पडोळ, शिवराज पाटील, लखन गाडेकर, विजय इतवारे, मनोज दांडगे, सोनू डोंगरे, डॉ. शरद काळे, साहेबराव डोंगरे, गजानन उबरहंडे, योगेश राजपूत, गणेशसिंग राजपूत, पत्रकार राजेंद्र काळे, अनिल म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संचालन गोविंद येवले यांनी केले.