अंढेरा गावासाठी कामाची बातमी; तहान भागणार...! प्रशासनाने घेतला "हा" निर्णय...

 
 बुलडाणा, (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार अंढेरा येथे तीन टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिली.


  अंढेरा गावात 8700 पशुधन व 3886 लोकसंख्येसाठी तीन टॅकर 2 लक्ष 49 हजार 740 लिटर्स पाणी पुरवठा करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता अंढेरा गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची पंचायत समिती यांनी नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.