प्रशासनाने खुला केलेला रस्ता अडवल्याने महिलांचे सोनेवाडी येथे उपोषण! तहसिलदारांच्या आदेशानंतरही जलसंधारण विभागाने कार्यवाही केली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप;

 रस्ता खुला करण्यासह दोषींवर कारवाई करण्याची मागणी...
 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील गट नं १० मधून गेलेला शेतरस्ता प्रशासनाने पोलीस संरक्षणात तात्पुर्ता खुला केला होता.परंतू सोनेवाडी ते पांगरी रस्ता  पुन्हा एकदा कांताबाई शंकर डवळे या महिलेने प्रशासनाला झूगारुण अडवल्याने सोनेवाडी येथील शेतकरी महिलांनी दि २४ जानेवारी पासून तलावाच्या सांडव्यामध्ये बेमुदत उपोषणा सुरू केले आहे.जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.त्या महिलेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून यापुर्वी तहसिलदार यांनी बैठक घेवून जलसंधारण विभाग, ग्रामपंचायत व भुमिका अभिलेख कार्यालयास बैठक घेत कारवाई चे आदेश दिले होते.असे असतांना कसलीही कार्यवाही जलसंधारण विभाग व संबंधित विभागाकडून करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
Advt

 Advt 👆

विशेष म्हणजे जलसंधारण विभागाच्या हद्दीत सतत ही महिला रस्त्यातच पेरणी करणे, सांडवाच वहीती करणे काटे टाकुन रस्ता आडवत असल्याने जलसंधारण विभागाचे अधिकारी करतात काय?असा सवाल उपोषणकर्त्या महिलांनी केला असून नुसत्या नोटिस देवून महिला जुमानत नसल्याचे समोर आले असल्याने या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात यावे,सोनेवाडी ते पांगरी अडवलेला रस्ता पुर्ववत खुला करण्यात यावा,त्याचप्रमाणे यापुर्वी तलाव बाधीत झालेल्या सांडव्यातील रस्ता व्यतिरिक्त बाहेरुन कायमस्वरूपी रस्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जनाबाई काळे,कुशीवर्ताबाई शेळके,मंगलाबाई काळे,कमलबाई गुंजकर,शे.भिकुबी शे.मुनीर यासह महिला आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

जलसंधारण विभागाच्या फक्त नोटिस पे नोटिस...अन् सांडवाच केला वहीती....

सोनेवाडी ते पांगरी रस्ता खुला करण्यासह इतर मागण्यांसाठी सोनेवाडी येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.तेव्हा तहसिलदारांनी या प्रकरणी सर्व विभागांना आदेश दिले होते.तेव्हा रस्ता खुला देखील करण्यात आला होता.असे असतांना तोच रस्ता आता वहिती करण्यात आला आहे.तर तसा पंचनामा देखील तलाठी व ग्रामसेवक यांनी केला आहे.असे असतांना जलसंधारण विभागाने त्या महिलेस सांडवा पेरु नये,अशा नोटिस पे नोटिस दिल्या असतांना त्या महिलेवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल शेतकरी महिलांनी उपस्थित केला असून जलसंधारण विभाग रस्ता वहिती करत असलेल्या महिलेला पाठीशी घालत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलांनी  केला आहे.


आमदार महाले,तुपकरांनी मध्यस्ती करत सोडवले होते उपोषण...

शेतकऱ्यांना शेतीमशीगती साठी शेतात ये जाय करणारा सांडव्यातीलच पर्यायी रस्ता गावातील एका महिलेने आडवला होता.यासाठी शेतकरी महिलांसह शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात उपोषण केले होते.तेव्हा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिने आमदार श्वेताताई महाले, शेतकरी नेते रविकांत तुपकर, विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी मध्यस्ती करत उपोषण सोडवले होते.तर तेव्हा महिलेस समज देऊन रस्ता खुल्या करण्यात आला होता.असे असतांना आता परत रस्ता अडवल्याने प्रशासन जलसंधारण विभाग रस्ता अडविणाऱ्या महिले विरोधात काय भुमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.