EXCLUSIVE खुर्ची कुणाची ? विश्व पानसरे एसपींच्या खुर्चीत , निलेश तांबे ॲडिशनल एसपींच्या खुर्चीत.... यंत्रणा कुणाच्या हातात? जिल्हा पोलीस दलात खळबळ....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नेत्यांमध्ये खुर्चीसाठी भांडणे झाल्याच्या अनेक घटना चर्चेत असतात..मात्र आता चक्क भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकाऱ्यांमध्येच खुर्चीवरून वादंग निर्माण झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत.. गत आठवडाभरापूर्वी बदली होऊन त्या बदलीवर स्थगिती मिळवणारे एसपी विश्व पानसरे यांनी आज सकाळीच एसपी कार्यालयातील खुर्चीचा ताबा घेतला आहे..दुसरीकडे गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारलेले एसपी निलेश तांबे सध्या ॲडिशनल एसपी बी. बी महामुनी यांच्या दालनात बसलेले आहेत.. एस पी कार्यालयातील सगळी यंत्रणा सध्या कन्फ्युज आहे? एसपी म्हणून कुणाचा आदेश मानायचा? जिल्हा पोलीस दलाचे बॉस कोण? अशा विविध प्रश्नांची चर्चा सुरू आहे...
   गेल्या आठवड्यात विश्व पानसरे यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नियुक्ती झाली होती. तांबे यांनी नियुक्ती झाल्यानंतर त्याच दिवशी पदभार स्वीकारला होता. दुसरीकडे एसपी विश्व पानसरे देखील अन्याय झालाची भावना झाल्याने कॅट मध्ये गेले होते. दुसऱ्याच दिवशी पानसरे यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती. पानसरे गेल्या आठवड्याभरापासूनच आजारी रजेवर होते.. इकडे निलेश तांबे एसपी म्हणून कारभार सांभाळत होते...अशातच आज सकाळीच अचानक विश्व पानसरे यांनी एसपी कार्यालयातील खुर्चीचा ताबा घेतला...
ही बाब कळताच निलेश तांबे देखील एसपी कार्यालयात पोहोचले, तांबे सध्या ॲडिशनल एसपी बी बी महामुनी यांच्या दालनातून कारभार सांभाळत आहेत.. तांबे यांनी पानसरे यांच्याकडे चार्ज दिलेला नाही..त्यामुळे सध्यातरी यंत्रणा तांबे यांच्याच हातात असल्याचे दिसत आहे.. विश्व पानसरे सध्या एकटेच एसपी कार्यालयातील खुर्चीत बसलेले आहेत.. एसपी पानसरे गणवेशात बसलेले आहेत...जिल्हा पोलिस दलात सध्या खळबळ उडाली आहे..एसपी म्हणून ऐकायचे कुणाचे? हा एकच प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे..