कुणी केला घात? मोताळा नांदुरा रस्त्यावर दोन तरुणांचा मृत्यू...

 
 मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा नांदुरा रोडवरील आडविहिर फाट्याजवळ दुचाकीचा अपघात(?) होवून २ युवक जागीच ठार झाले.  ही घटना शनिवार १४ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार अंत्री येथील अतुल गजानन जवरे  (३१) व गोपाल भगवान काठोळे (२१) हे दोघे १४ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोताळा येथून नांदुऱ्याकडे जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीचा आडविहिर फाट्याजवळ अपघात झाला. यामध्ये अतुल व गोपाल दोघेही जखमी गंभीर झाले बोराखेडी पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे. चे पोहेकाँ. नंदकिशोर धाडे व बरडे हे घटनास्थळी पोहचले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेने बुलडाणा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अतुल व गोपालच्या अपघाती जाण्याने अंत्री गावावर शोककळा पसरली आहे.
या दोघांचा अपघात कसा झाला? हा अपघात आहे की ठरवून केलेला घात? याबाबत तर्कवितर्क वर्तवले  जात आहेत..