जिल्हा पोलीस दलाचे बॉस कोण? तांबे कि पानसरे..थोड्याच वेळात निर्णय लागण्याची शक्यता
२२ मे रोजी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली झाली होती. त्यांच्या ऐवजी निलेश तांबे यांना बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याच दिवशी तांबे यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभारही स्वीकारला होता. दुसरीकडे वैद्यकीय रजेवर गेलेल्या पानसरे यांनी बदलीच्या आदेशाला थेट कॅटमध्ये आव्हान दिले. कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच नऊ महिन्यांच्या आतच बदली होत असल्याने अन्याय झाल्याची भावना पानसरे यांची होती. २३ मे रोजी कॅट मध्ये सुनावणी होऊन पानसरे यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती..मात्र दुसरीकडे निलेश तांबे हेच बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कारभार सांभाळत होते..
३० में रोजी सकाळी साडेसात वाजताच विश्व पानसरे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या खुर्चीचा ताबा घेतला होतो. रजेवर होतो हजर झालो एवढेच त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे ३० मे रोजी एकाच पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन पोलीस अधीक्षक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी आयजी रामनाथ पोकळे यांनी येऊन मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला होता.. या प्रकारानंतर कॅटमध्ये या विषयावर तीन सुनावण्या झाल्या. मात्र अंतिम निर्णय लागला नाही..आज ४ जुलै रोजी यावर अंतिम निर्णय घेणे अपेक्षित आहे..