

आभार कसले मागता? माफी मांगा माफी! एकनाथ शिंदे यांच्या बुलढाणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयश्री शेळके कडाडल्या; म्हणाल्या, तुमचे लोकप्रतिनिधी मतदारांना शिव्या देतात...
जयश्री शेळके म्हणाल्या की, बुलढाणा जिल्हा राज्यातील तिसरा क्रमांकाचा गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी युवा प्रगतिशील शेतकरी कैलास नागरे या आमच्या शेतकऱ्याने शेतीला पाणी देता येत नाही म्हणून आत्महत्या केली होती. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी कर्जमाफी मागत आहेत. परंतु तुम्ही सांगताहेत की कर्जमाफी देऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला तुम्ही भाव देऊ शकत नाही. पीक विम्याची मदत पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळाली नाही. एवढेच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील युवा बेरोजगार रोजगार उपलब्ध नाही म्हणून स्थलांतरित करत आहे. प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यवस्था ग्रामीण भागातील दयनीय आहे. इतकी सगळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये दयनीय अवस्था असताना आभार कसले मानतात तुम्ही तर राज्यातील, बुलढाणा जिल्ह्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे असे जयश्री शेळके म्हणाल्या. तुमच्या लोकप्रतिनिधीला कमी मताने का होईना लोकांनी सभागृहात पाठवलं. हेच लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मतदारांना शिव्या देण्याचं काम करतात.त्यामुळे उपमुख्यमंत्री साहेबानी बुलढाणा जिल्ह्यामध्ये येऊन जनतेचे आभार मानण्यापेक्षा जनतेची माफी मांगावी अशी टिका शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रवकत्या जयश्री शेळके यांनी केली आहे