पेरणी कधी करायची? प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सांगितला जून महिन्याचा संपूर्ण शेड्युल....वाचा नेमका अंदाज ..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी यंदाच्या मान्सूनसंबंधी दिलेल्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांना यंदा जून महिन्यात वेळेवर पेरणी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, पेरणीस पोषक अशा जमिनीतील एक इंच ओलावा यापूर्वीच अनेक भागांमध्ये तयार झाला आहे.
कधी करावी पेरणी?
राज्य हवामान खात्याने १० जूनपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे, मात्र त्याउलट
पंजाबराव डख यांचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे .पेरणीयोग्य ओलावा असल्यास, वेळेवर पेरणी फायदेशीर असल्याचे डख यांचे म्हणणे आहे.
२ ते ६ जून: सूर्यप्रकाशाचा काळ – शेतीची कामे पूर्ण करण्याची योग्य वेळ.
७-८ जून: पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.
 ९-१२ जून: पावसाची विश्रांती – शेतजमिनीची तयारीसाठी आणखी एक संधी.
१३-१७ जून: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज – धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्याची शक्यता.
शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांची सूचना..
पेरणीसाठी जमीन तयार आहे का, हे स्थानिक परिस्थितीनुसार ठरवाजमिनीत भरपूर ओलावा दिसत असेल, तर उशीर न करता पेरणी सुरू करा.पावसाच्या विश्रांतीच्या काळात शेतीची तयारी पूर्ण करा. मान्सून पूर्वेकडून येत असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज.
पाऊस कधी आणि कुठे?
१-६ जून: मुंबई, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, कोकण भागात रिमझिम सरी. ७-१० जून: राज्यभर पुन्हा पाऊस.
१३-१७ जून: जोरदार पावसाचा दुसरा टप्पा – बंधारे, ओढे भरतील. पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांनी या वर्षीच्या वेळेवर आणि नियोजनबद्ध पेरणीचा लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीतील ओलावा आणि स्थानिक हवामान पाहून निर्णय घ्यावा आणि शक्य असल्यास १० जूनच्या आत पेरणी पूर्ण करावी, ही शिफारस त्यांनी केली आहे.
उत्पादन वाढीचे वर्ष? 
शेतकऱ्यांसाठी हे वर्ष उत्पादनवृद्धीचे ठरण्याची शक्यता आहे — योग्य नियोजन आणि योग्य वेळेवर अंमलबजावणी केली, तर यंदाचा हंगाम "सुगीचा" ठरेल.