बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मागे काय चालतं? अंमलीपदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी एकास पकडले

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील शासकीय इमारतीच्या मागे नशेखोर युवकांनी नशेचा अड्डा बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीमागील गल्लीत एक युवक अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांना आढळून आला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेमुळे शहरातील अनेक शासकीय इमारतीच्या मागे नशेखोरांचा अड्डा असेल व सुट्टीच्या दिवशी निर्जन ठिकाण पाहून नशेखोर अश्या ठिकाणी संधी साधत असतील याची शक्यता नाकारता येत नाही.

शेख सलीम शेख रफीक (32 वर्ष, रा जोहर नगर बुलढाणा) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. ९ मे रोजी बुलढाणा शहर पोलीस गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली. त्याआधारे, छापा मारला असता  जिल्हा परिषदचे पाठीमागील रोडवर मोकळ्या जागेत एक इसम अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचे दिसून आले.  आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ शासनाने प्रतिबंधित केलेला अमलीपदार्थ आढळला. यावरून, पोलिसांनी त्याच्याविरोधात एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार सुनीता खंडारे करित आहेत.