

क्या बात! ऑन दि स्फॉट एफआयआर अन् २४ तासांच्या आता न्यायालयात चार्जशिट दाखल! एसपी "पानसरे पॅटर्न" ठरतोय सुपरहीट...
Apr 17, 2025, 20:48 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला आणि वृद्धांसाठी बुलढाणा जिल्हा पोलिसांनी एफआयआर ऑन दि स्फॉट या उपक्रमाची मागील आठवड्यात घोषणा केली होती. प्रारंभी जिल्ह्यातील दहा पोलीस ठाण्यांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्प अंतर्गत पहिला ऑन दि स्फॉट एफआयआर काल १६ एप्रिलला मेहकर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. दरम्यान आता त्याच प्रकरणात २४ तासांच्या आत तपास पूर्ण पोलिसांनी दोषारोप पत्र देखील न्यायालयात दाखल केले आहे.. झटपट आणि वेगवान तपासाचा हा "पानसरे पॅटर्न" सुपरहिट ठरत आहे.
मेहकर येथील मिलिंद नगर मध्ये राहणाऱ्या आत्माराम गजानन इंगळे हे त्यांच्या घराच्या अंगणामध्ये झोपलेले असताना आत्माराम इंगळे यांचा नातं जावई अमोल माने याने कौटुंबिक कारणातून त्यांना मारहाण केली होती. यामध्ये आत्माराम इंगळे हे गंभीर जखमी झाले होते. आत्माराम इंगळे हे वृद्ध असल्याने व त्यांना पोलीस ठाण्यात येणे अडचणीचे असल्याने पोलिसांनी
त्यांच्या घरी जाऊन ऑन द स्पॉट एफआयआर नोंदवला होता. पंचनामा करून साक्षीदारांचे जबाब देखील नोंदविले तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या काठीची वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून अहवाल प्राप्त केला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास २४ तासाच्या आत पूर्ण करून आरोपी अमोल बबन माने याचा विरुद्ध २४ तासात दोषारोपपत्र मेहकर न्यायालयात दाखल केले.