हनवतखेड, गिरडा व मढ गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू; दररोज हजारो लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध...

 

बुलडाणा (जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड, गिरडा व मढ या तीन गावांसाठी दररोज टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. संबंधित आदेशानुसार नियमित टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी दिली.
टँकरद्वारे होणारा दररोजचा पाणीपुरवठा पुढीलप्रमाणे:
  • हनवतखेड: 147 पशुधन व 397 लोकसंख्येसाठी 13,820 लिटर
  • गिरडा: 255 पशुधन व 940 लोकसंख्येसाठी 20,900 लिटर
  • मढ: 425 पशुधन व 2,134 लोकसंख्येसाठी 30,900 लिटर
प्रत्येक टँकर खेप ग्रामपंचायतीकडे नोंदवहीत नोंदवली जाणार आहे.  गटविकास अधिकारी नोंदवहीची नियमित तपासणी करणार आहेत. तसेच, निविदाधारकाने टँकर नादुरुस्त झाल्यास त्वरित पर्यायी टँकर उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पाणीटंचाईमुळे त्रस्त गावकरी व शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.