व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीचे उरले अवघे दोन दिवस ! जिल्ह्यातील सर्वाधिक पत्रकारांनी केली व्हॉईस ऑफ मीडियाची सदस्य नोंदणी...
Dec 30, 2024, 16:21 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य ,देश नव्हे तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम उभे करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. गेल्या पंधरवाड्यापासून सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. डिजिटल स्वरूपामध्ये अतिशय पारदर्शक स्वरूपात हे सदस्य नोंदणी अभियान सुरू असल्याने प्रतिसाद ही व्यापक मिळाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक पत्रकार व्हॉईस ऑफ मीडियासोबत जोडले गेले आहेत. आता उरलेल्या दोन दिवसात म्हणजेच ३१ डिसेंबरच्या सायंकाळ पर्यंत आपल्या सदस्यत्वावर शिक्का मोर्तब करावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडिया परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे पत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण, घर, विविध कार्यशाळा , आणि सर्वात महत्त्वाचे असलेल्या कल्याणकारी मंडळाच्या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडियाने फ्लॅग शिप प्रोग्राम आखला आहे. यात रस्त्यावर उतरून केली जाणारी लोकशाही मार्गाची आंदोलने असो किंवा मग विधिमंडळामध्ये विविध लोकशाहीच्या आयुधांनी सुरू केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने पत्रकार कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली आहे त्यात आता निधी आणि पुढील स्वरूपातील लाभ यावर व्हाईस ऑफ मीडियाचा लढा कायम राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या पाठपुराव्यातून ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. शिवाय स्थानिक पातळीवर पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या आरोग्य विषयक व अन्य समस्यांच्या दृष्टीने ही काम सुरू आहे. या सर्व बाबींचा लाभ मिळण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांना प्राधान्य राहील. त्यामुळे उरलेल्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये व्हाईस ऑफ मीडियाची सदस्य नोंदणी अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीसाठी ५०० रुपये एवढे शुल्क ठेवण्यात आले असून ते ८६९८४७४०६२ (श्रीकृष्ण सपकाळ) यांच्याकडे जमा करावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे..