व्हाईस ऑफ मीडियाची बुलढाणा शहर कार्यकारणी घोषित! नदीम शेख यांच्या खांद्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी; प्रवीण थोरात कार्याध्यक्षपदी ! पवन सोनारे जिल्हा कार्यकारिणीत सहसंघटक...
Jan 14, 2025, 19:37 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : व्हाईस ऑफ मीडियाच्या बुलढाणा शहराची बैठक आज स्थानिक पत्रकार भवनात पार पडली. यावेळी बुलढाणा शहराच्या नवनियुक्त कार्यकारणीशी घोषणा करण्यात आली. बुलढाणा शहराच्या अध्यक्षपदी लोकमत समाचार चे युवा जिल्हा प्रतिनिधी नदीम शेख यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर कार्याध्यक्ष म्हणून महाभुमीचे प्रवीण थोरात यांची निवड झाली आहे. याशिवाय बुलढाणा जिल्ह्याच्या कार्यकारणीत बिसीसीएनचे वरिष्ठ पत्रकार पवन सोनारे यांची सहसंघटक पदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला राज्य कोर कमिटीचे सदस्य अरुण जैन, राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, जिल्हा कार्यकारणी मार्गदर्शक संजय मोहिते, जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ, जिल्हा सहसरचिटणीस सुनील तिजारे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते, गजानन धांडे यांच्यासह शहरातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष नदीम शेख यांनी शहर कार्यकारणीची घोषणा केली.
अशी आहे शहर कार्यकारिणी..
नदीम शेख- (लोकमत समाचार) अध्यक्ष
प्रवीण थोरात- (महाभुमी )कार्याध्यक्ष
हर्षनंदन वाघ (पुण्यनगरी)-सरचिटणीस
सचिन लहाने(पुण्यनगरी)–उपाध्यक्ष
शौकत शहा(एशिया मंच)- उपाध्यक्ष
सोहम घाडगे(नवराष्ट्र)- उपाध्यक्ष
आसिफ शेख -( प्रखर देशभक्त) कोषाध्यक्ष
शाहिद शहा- (खोज मास्टर)सहसरचिटणीस
सदस्य
ॲड.रहीम शहा( शब्ददौलत)
विलास सोनुने (देशोन्नती)
अमोल पोधाडे ( पुण्यनगरी)
इद्रीस भाई(विदर्भ दस्तक)
अस्लम शहा (दिव्य मातृशाया)
सोहिल शहा(दैनिक भास्कर)
दिपक इंगळे(दैनिक भास्कर)
राम चतुर(सामना)
रवी वायाळ(लोकमत)
विलास एकडे (बीसीसीएन)
निलेश शहाकार(सकाळ)