BREAKING भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी विजयराज शिंदे...! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपच्या जिल्हा नेतृत्वात मोठा खांदेपालट करण्यात आला आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या खांद्यावर घाटावरील जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. याआधी डॉ. गणेश मांटे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती.

घाटाखालील जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा एकदा सचिन देशमुख यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी जबाबदारी मानल्या जात आहे.