

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज जिल्ह्यात! बुलढाण्यात प्रशासकीय बैठक, मलकापुरात जनसंवाद मेळावा; दौऱ्यात आणखी काय काय कार्यक्रम? वाचा...
Updated: Apr 8, 2025, 08:49 IST
बुलढाणा (जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आज, ८ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. याशिवाय ते पत्रकार परिषदेलाही संबंधित करणार आहेत...
दौऱ्याचा तपशील
दुपारी अडीच वाजता ते जळगावहून शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे पोहोचतील.दुपारी ४ वाजता सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत आढावा बैठक घेतील.त्यानंतर पावणे पाच वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि समाजकल्याण अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतील. पत्रकार परिषदेनंतर मलकापुरातील लायब्ररी ग्राउंड येथे सव्वा सहा वाजता जनसंवाद मेळाव्यात नागरिकांशी संवाद साधणार आहेत. रात्री ८:५५ वाजता ना .रामदास आठवले मलकापूरहून पुण्याकडे रेल्वेने रवाना होतील...
या दौऱ्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भातील चर्चा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे.