राजकारणाच्या वारीतील संवेदनेचा वारकरी : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव; दुबईत अडकलेल्या कुटुंबीयांना पोचवले सुखरूप घरी....!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :‘वेदना’ आणि ‘संवेदना’… या दोन शब्दांमध्ये फरक फक्त एका अक्षराचा... पण त्या एका अक्षरामुळे माणसाच्या आयुष्याचा अर्थ आणि संदर्भ बदलू शकतात. कुणाच्या वेदनेकडे जर मनापासून संवेदनेनं पाहिलं, तर ती वेदना फुलात उमलते… आणि दुःख आशेमध्ये बदलतं. वेदनेची फुलं होतात. राजकारण ही मुळात समाजाच्या वेदना समजून घेण्यासाठी निर्माण झालेली एक संवेदनशील व्यवस्था आहे. लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, त्यांच्या अश्रूंना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी व्यवस्था केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिली आहे
अमेरिका आणि इराकच्या युद्धामुळे जगातील परिस्थिती सध्या अतिशय तणावपूर्ण झाली आहे. या परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये विमानसेवा विस्कळीत झाली आहे. त्याचे पडसाद दुबईसह अनेक ठिकाणी दिसत आहेत.अकोला येथील माजी जेष्ठ नगरसेवक गोपीभाऊ ठाकरे यांचे जावई तुषार घोराडकर, मुलगी सायली आणि पुजा ठाकरे आणि सात वर्षाचा नातू अहान हे युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकून पडले होते. भारतात परत जाण्यासाठी कोणताच मार्ग दिसत नव्हता. यातून कधी बाहेर पडू याची कोणतीही शाश्वती त्यांना दिसत नव्हती.
काल 4 मार्चला दुपारी गोपीभाऊंचा फोन अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार उमेश अलोने यांना आला. नेहमी करारी आणि बिनधास्त वाटणाऱ्या त्या आवाजात त्या दिवशी अस्वस्थता आणि काळजी स्पष्ट जाणवत होती. “उमेश… मला तुला लगेच भेटायचं आहे,” ते म्हणाले. लेकी, जावई आणि नातवाच्या काळजीने व्याकुळ झालेला एक हतबल बाप माझ्यासमोर उभा होता.
विमानसेवा बंद असल्यामुळे पुढील दहा-बारा दिवस त्यांची सुटका होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. त्या क्षणी त्यांनी राज्य कामगार विमा योजना विभागाचे संचालक सोहम वायाळ यांच्या माध्यमातून दिल्लीतील जाधव साहेबांच्या कार्यालयाशी संपर्क साधला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या टीमने परराष्ट्र मंत्रालय आणि दुबईतील भारतीय दूतावासाशी तातडीने संपर्क साधून अवघ्या दोन तासांत त्यांची तिकिटं कन्फर्म करून दिली व रात्री ते भारतासाठी रवाना झाले…
आणि आज दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत सुखरूप पोहोचले. विदेशातून मायभूमीत आल्यानंतर त्यांच्या मुलीने आपल्या वडिलाला फोन केला बाबा पोहचलो त्यावेळी गोपीभाऊंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते दुःखाचे अश्रू नव्हते… तर ते एका बापाचे आनंदाश्रू होते.. ते अश्रू होते दिलासा मिळाल्याचे… समाधानाचे… त्या अश्रूंमध्ये एका बापाचा भार उतरल्याचा क्षण होता.
आणि त्या आनंदामागे होते केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे संवेदनशील नेतृत्व आणि लोकांसाठी काम करणारी त्यांची संपूर्ण टीम ....