केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव आज अतिवृष्टीग्रस्त शेतजमिनींची करणार पाहणी; सुलतानपूर येथून दौऱ्याला सुरुवात...
Jun 28, 2025, 08:43 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यात २६ जून रोजी लोणार व मेहकर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने थैमान घातले. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतजमिनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे आज, २८ जून रोजी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत.
आज सकाळी १० वाजता त्यांच्या दौऱ्याला लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथून सुरुवात झाली आहे. त्यानंतर अंजनी, शारा, वेणी गुंधा या गावांमधील शेतजमिनींची पाहणी केली जाणार आहे.
त्यानंतर मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख, डोणगाव, गोहेगाव, पांगरखेड, जनुना शेलगाव देशमुख, विश्वी आणि घाटबोरी या अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा मंत्री जाधव करणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करतील.