भारताच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा नरेंद्र मोदींचा रेकॉर्ड! मोदींच्या दीर्घायुष्यासाठी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांची बालाजीचरणी प्रार्थना, महाआरतीही केली

 
मेहकर(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान या नात्याने १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. देशाच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा पंडित नेहरू यांचा रेकॉर्ड नरेंद्र मोदी यांनी मोडला आहे. नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्ती आणि निरंतर देशसेवेसाठी दीर्घायुष्य लाभावे यासाठी मेहकरच्या श्री शारंगधर बालाजी महाराजांच्या चरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रार्थना करत आरती केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना ना.जाधव म्हणाले की, देशाच्या सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केला आहे. दीडशे कोटी भारतीयांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळेच हे शक्य झाले. देशहितासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या नरेंद्र मोदींना दीर्घ निरोगी आयुष्य लाभावे यासाठी बालाजींच्या चरणी प्रार्थना केल्याची त्यांनी सांगितले. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वात भारताला विकसित करण्याचा मार्ग दाखवत जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे. देशाला पुन्हा एकदा वैभवाच्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात होणार असल्याचे ना जाधव यावेळी म्हणाले.
 यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, दिलीपराव देशमुख, किसनराव बळी, सुरेश वाळुकर, जयचंद बाढीया, डॉ.सुभाष लोहिया, बबनराव भोसले, बबनराव तुपे, रामेश्वर म्हस्के, शिवसेना नगरसेवक ओम सोभागे, विशाल काबरा,मनोज जाधव, मंगेश गायकवाड उपस्थित होते