दुर्दैवी BIG BREAKING! सुसाट पल्सर झाडावर आदळली; ३ तरुणांचा जागीच मृत्यू! चिखली–जाफ्राबाद रोडवरील घटना

 
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज,२५ मार्चला थोड्या वेळापूर्वी चिखली जाफ्राबाद रोडवर भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळली, यात दुचाकीस्वार ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पळसखेड दौलत गावाच्या समोर असलेल्या भोकरवाडीजवळ हा अपघात झाला...
  घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातात ठार झालेले तिघेही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील राहणारे आहेत. रोहित महादू चाबूकस्वार (२४), शुभम रमेश चाबूकस्वार (२५) , सोनू सुपडू उसरे (२३) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. एम एच १५, ०७५७ क्रमांकाच्या पल्सर वाहनाने तिघे तरुण कुंभारी येथे जात होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे..